तुम्ही शेर तर पोलिस सवाशेर! विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका
X
कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी केंद्र सरकारने देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. पण काही राज्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आता लॉकडाऊन ३ मेच्याही पुढे वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तेलंगणामध्ये आता ७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. पण त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या राज्याने आता एक मोठा निर्णय घेतलाय.
तेलंगणामध्ये नागरिकांना घराबाहेर पडताना त्यांच्या रहिवासाचा पुरावा आता सोबत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे या नागरिकांना घरापासून ३ किलोमीटरच्या आतच अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी फिरता येणार आहे, अशी माहिती तेलंगणाचे डीजीपी एम. महेंद्र रेड्डी यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या आसपासच्या हॉस्पिटल्समध्ये जावे. फक्त अत्याश्यक वैद्यकीय गरज असल्यास अशा रुग्णांना सूट दिली जाणार आहे, असंही रेड्डी यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने ६ विविध रंगांचे पास बनवून द्यावे अशी मागणीही केल्याचे रेड्डी यांनी सांगितले. या पासवर त्या व्यक्तीच्या घऱाचा पत्ता आणि ज्या ठिकाणी कामाला जाणार आहे तिथला पत्ता असे दोन्ही असतील. त्यामुळे कामा व्यतिरिक्त इतरत्र फिरणाऱ्यांवर कारवाई करता येईल असे रेड्डी यांनी सांगितले.