Home > हेल्थ > हेल्थ पॉलिसीचा क्लेम कसा करावा?

हेल्थ पॉलिसीचा क्लेम कसा करावा?

हेल्थ पॉलिसीचा क्लेम कसा करावा?
X

Photo courtesy : social media

लोकांच्या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत दवाखान्यात अधिक पैसे जाऊ नये म्हणून लोक हेल्थ पॉलिसी घेत असतात. मात्र, अचानक आजारी पडल्यानंतर आपल्याला आपण घेतलेल्या वीमा पॉलिसीनुसार पैसे कसे मिळवायचे? किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये आपण भरती झालो आहोत तिथं कॅशलेस सिस्टीम आहे का? हे देखील आपल्याला माहिती नसते. अशा वेळी त्या हॉस्पिटलमध्ये जर कॅशलेस सिस्टिम नसेल तर तुम्हाला विम्याचे पैसे कसे मिळणार? हा प्रश्न अनेक लोकांना पडलेला असतो.

हॉस्पिटल मध्ये भरती झाल्यानंतर काय करणार?

जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करत असतात. तेव्हाच तुम्ही तुमच्या वीमा कंपनीला त्वरीत माहिती कळवायची आहे. सर्व कागदपत्र संबधीत रुग्णालयात जाताना सोबत घ्यावीत. त्यामध्ये हॉस्पिटल रजिस्‍ट्रेशनसारख्या काही कागदपत्रांची आवश्यता असते. त्यानंतर रीइंबर्समेंट क्‍लेम फॉर्म भरावा लागेल.

डिस्‍चार्ज नंतर फॉर्मैलिटीज

डिस्चार्ज नंतर, १५ दिवसांच्या आत क्लेम करणं गरजेचं आहे. त्यासोबत जोडली गेलेली सर्व कागदपत्र योग्य असावीत. या कागदपत्रांसोबतच तुम्हाला एक ब्लॅंक चेक देखील जोडणं गरजेचं आहे. त्या अकाउंटवरती क्लेमचे पैसे परत पाठवले जातील.

काय असेल प्रक्रिया?

तुम्ही तुमचा क्लेम केल्यानंतर वीमा कंपनी या कागदपत्रांची पडताळणी करते. काही अडचण वाटल्यास पुन्हा एकदा ते कागदपत्र तपासण्याचं काम करु शकतात. ही पडताळणी झाल्यानंतर कंपनी केलेला क्लेम पूर्ण प्रमाणात अथवा अंशीक प्रमाणात मंजूर करू शकते. या संदर्भात कंपनी तुम्हाला माहितीही कळवते.

हे नेहमी लक्षात ठेवा…

ज्या बाबी तुम्ही क्लेमसाठी पाठवत असता. त्याच्या कॉपी तपासून आपल्याकडे कायम ठेवाव्यात. भविष्यात आपल्याला त्या कधीही उपयोगी पडतात.

Updated : 23 Aug 2021 2:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top