Home > News Update > इम्रान खान यांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल अखेर जगासमोर

इम्रान खान यांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल अखेर जगासमोर

इम्रान खान यांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल अखेर जगासमोर
X

पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांची फैसल एधी यांनी भेट घेतली होती. मात्र, फैसल यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर इम्रान खान यांची कोराना ची चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

फैसल एधी हे पाकिस्तान मधील प्रसिद्ध एधी फाऊंडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी १५ एप्रिल ला पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर इम्रान यांच्याबाबतही शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळं इम्रान खान यांची देखील कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल नेगटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान च्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

“प्रधानमंत्री इम्रान खान यांची आज सार्स-कोव-२ चाचणी करण्यात आली. (सार्स-कोव-२ विषाणूमुळे कोरनाचा लागण होते.) मला हे सांगताना आनंद होत आहे. की त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे,”

असं त्यांनी या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

Updated : 24 April 2020 9:33 AM IST
Next Story
Share it
Top