मन की बात: देशभक्तीचा डोस की गरिबांसाठी पॅकेजची घोषणा?
X
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता देशवासियांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. देशात कोरोना व्हायरस ची संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवू शकतात. असं काही तज्ञांचं मत आहे. मात्र, त्यातच देशातील इकॉनॉमी ची चाकं कोरोना व्हायरस च्या संकटात रुतल्यानं देशात आर्थिक आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजच्या या मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या कामकारांना काही दिलासा देतात का? अनेक लोकांवर लॉकडाऊनमुळं उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी काही पॅकेजची घोषणा करतात का? डॉक्टरांना पीपी किट्स सह मेडिकल साधन नसल्यामुळं कोरोना ची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मेडीकल साधनांवर काही बोलतात का? की नेहमी प्रमाणे देशभक्तीचे डोस पाजतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.