Home > News Update > धक्कादायक: राज्यात एका दिवसात 811 रुग्णांची नोंद, 22 लोकांचा मृत्यू

धक्कादायक: राज्यात एका दिवसात 811 रुग्णांची नोंद, 22 लोकांचा मृत्यू

धक्कादायक: राज्यात एका दिवसात 811 रुग्णांची नोंद, 22 लोकांचा मृत्यू
X

आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,१२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Big News: खाजगी रुग्णालये ताब्यात घ्या!: अजित पवार | #MaxMaharashtra

आज राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३२३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १३, पुणे महानगरपालिका येथे ४ तर मालेगाव येथे १, पुणे ग्रामीणमध्ये १, पिंपरी चिंचवडमध्ये १, धुळे येथे १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये (५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ५०४९ (१९१)

ठाणे: ७१७ (१५)

पालघर: १३९ (४)

रायगड: ५६ (१)

मुंबई मंडळ एकूण: ५९६१ (२११)

नाशिक: १३१ (१२)

अहमदनगर: ३५ (२)

धुळे: २५ (३)

जळगाव: १३ (२)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: २१५ (२०)

पुणे: १०३० (७३)

सोलापूर: ४६ (४)

सातारा: २९ (२)

पुणे मंडळ एकूण: ११०५ (७९)

कोल्हापूर: १०

सांगली: २६ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद: ५० (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)

लातूर: ९

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: १

लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: २३ (१)

अमरावती: १९ (१)

यवतमाळ: २८

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ९२ (३)

नागपूर: १०७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ११० (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ७६२८ (३२३)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Updated : 25 April 2020 9:24 PM IST
Next Story
Share it
Top