कोरोना संपला नाही! राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०६ हजार ७६४ वर
कोरोना संपला नाही! राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०६ हजार ७६४, पाहा तुमच्या जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 July 2021 9:42 PM IST
X
X
आज राज्यात ८,६०२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १७० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आज ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ % एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४६,०९,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८१,२४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १,०६,७६४ आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
Updated : 14 July 2021 9:42 PM IST
Tags: Maharashtra Covid Update
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire