दिलासा : नवीन कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांनी घटली
X
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर गेल्याने चिंता वाढली होती. पण मंगळवारी दिलासादायक आकडेवारी आली आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २ लाख ५५ हजार ८७४ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या सोमवारी आढळलेल्या रुग्ण संख्येपेक्षा ५० हजार १९० ने कमी आहे. पण गेल्या २४ तासात देशात ६१४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ६७ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी देशात १६ लाख ४९ हजार १०८ जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी २ लाख ५५ हजार ८७४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसते आहे. सध्या महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 28 हजार 286 नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या 12,519 ने घटली आहे. पण 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
सोमवारी संध्याकाली ६ वाजेपर्यंत्या आकडेवारीनुसार मुंबईत २४ तासात १८५७ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात बरे झालेले रुग्ण ५०३ होते. तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या २१ हजार १४२ आहे. आणि रुग्ण दुप्पटीचा दर १४४ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान Omicron व्हेरिएन्टच्या प्रचंड संसर्ग क्षमतेमुळे तिसरी लाट जास्त मोठी असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मुंबईच कोरोचे रुग्ण कमी होत आहेत. पण मुंबईत तिसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले त्यापैकी ८९ टक्के रुग्णांना Omicronची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिसरी लाट ही Omicronची आहे, हे आता उघड झाले आहे. मुंबईतील 280 नमुन्यांपैकी 89 टक्के म्हणजे 248 नमुने हे चाचणी दरम्यान Omicron बाधीत होते असे आता जिनोम सिक्वेन्सिंग मधून समोर आले आहे. तर २८० पैकी 8 टक्के म्हणजे 21 नमुने हे Delta व्हेरिएन्टचे होते. तर उरलेल्या 3 टक्क्यांमध्ये म्हणजे 11 जणांच्या नमुन्यांमध्ये इतर प्रकार दिसले आहेत.