Home > News Update > गिरीश महाजन यांची कोरोना व्हायरस ची टेस्ट करा: राष्ट्रवादी कॉंग्रेस

गिरीश महाजन यांची कोरोना व्हायरस ची टेस्ट करा: राष्ट्रवादी कॉंग्रेस

गिरीश महाजन यांची कोरोना व्हायरस ची टेस्ट करा: राष्ट्रवादी कॉंग्रेस
X

माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची वैद्यकीय तपासणी करून होमकोरोंटाईन करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

गिरीश महाजन हे सात दिवस मुंबई येथे होते. मुंबई कोरोनाची मोठी लागण झाली आहे. त्या भागात जाऊन महाजन हे जामनेर येथे आले आहेत. नियमानुसार आमदार गिरीश महाजन यांची सर्व सामान्य लोकांप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस होमक्वारंटाइन करा.

गिरिश महाजन यांचं निवासस्थान हे दाट लोकवस्तीत असल्याने नियमानुसार कार्यवाही करावी. अशी मागणी जळगाव जिल्हातील जामनेर राष्ट्रवादीने केली आहे.

गिरीश महाजन यांनी स्वतः पुढे ही येऊन तपासणी करून होमक्वारंटाइन व्हावं अस आवाहन ही राष्ट्रवादीनं निवेदनाद्वारे केलं आहे.

Updated : 25 April 2020 6:45 PM IST
Next Story
Share it
Top