Home > News Update > कोरोनाशी लढा: कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार – WHO

कोरोनाशी लढा: कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार – WHO

कोरोनाशी लढा: कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार – WHO
X

जगभरात कोरोनाचे २६ लाखांच्यावर रुग्ण झालेले आहेत. तर मृतांची संख्या १ लाख ८७ हजार झाली आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोनाचा मुक्काम आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे, असा इशारा दिला आहे. जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची महामारी अजून पहिल्या टप्प्यातच आहे, त्यामुळे कोरोनाचे संकट संपलेले नाही असं WHOचे टेड्रॉस अधनॉम घेब्रेसेस यांनी म्हटले आहे.

पण अनेक देशांमध्ये लोकांना घरीच राहण्याची सक्ती आणि सोशल डिस्टन्सिंगसह केलेल्या उपाययोजनांमुळे संसर्गाचे प्रमाण कमी राखण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. “बऱ्याच देशांमध्ये कोरोना अजूनही सुरूवातीच्या टप्प्यात आहे. तर कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आलेल्या देशांमध्येही पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत ” असंही टेड्रॉस यांनी सांगितले.

Updated : 23 April 2020 8:26 AM IST
Next Story
Share it
Top