Home > News Update > देशात कोरोना ने घेतले 603 बळी, रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात...

देशात कोरोना ने घेतले 603 बळी, रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात...

देशात कोरोना ने घेतले 603 बळी, रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात...
X

देशातील कोरोनाचे रुग्ण आणि कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासातील स्थितीवर एक नजर टाकूया.....

देशभरात कोरोना प्रसार वाढतोय. मंगळवारी देशातील कोरोनाबळींच्या संख्येने ६००चा टप्पा गाठला. गेल्या २४ तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ हजार ३२९ ने वाढली आहे. त्यामुळे आता देशातील एकूण रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. तर २४ तासात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने आता एकूण कोरोनाबळींची संख्या ६०३ झाली आहे.

दरम्यान १८ हजार ९८५ रुग्णांपैकी ३ हजार २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. दरम्यान कोरोना बाधीत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या प्रमाणात १७.४८ टक्के आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या ५ हजारांच्यावर गेली आहे. त्यानंचर दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमध्ये रुग्णसंख्या आढळली आहे.

Updated : 22 April 2020 6:07 AM IST
Next Story
Share it
Top