देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ४० हजारांच्यावर
X
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. पण देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढून आता ४० हजार २६३ वर पोहोचली आहे. तर १ हजार ३0६ जणांचा मृत्यू झाला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी १० हजार ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता २८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आता राज्य सरकारांच्या मदतीसाठी केंद्रानं १५ पथकं तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये ही पथकं राज्य सरकारांना कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी मदत करणार आहेत. यात महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे, गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत, दिल्लीचा काही भाग, मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, राजस्थानात जयपूर आणि जोधपूर, तेलंगणामध्ये हैदराबाद, तामिळनाडूमध्ये चेन्नई, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि उत्तर प्रदेशात आग्रा इथं ही पथकं काम करणार आहेत.