कोरोनाचे संकट: खान्देशची वाटचाल रेड झोनकडे
X
जळगाव धुळे आणि नंदुरबार या खान्देशातील तीन जिल्ह्यांची वाटचाल गेल्या दोन दिवसात ग्रीन झोनवरून ऑरेंज आणि आता रेड झोनकडे होत असल्याचे चित्र आहे.
जळगाव
या कोरोनाबाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचाच पती असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
धुळे
धुळे जिल्ह्यात कोराना विषाणूचे आणखी 5 रुग्ण आढळले आहेत. यात धुळे शहरात 4 तर शिंदखेडा तालुक्यातील एका 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. धुळे शहरातील चार रुग्ण 20 ते 45 वर्षे वयोगटातील आहेत. या सर्व रुग्णांवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
नंदुरबार
नंदुरबारमध्ये एकाच कुटुंबातील चार जण कोरोना बाधीत आढळले आहेत. आधी या घरातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या घऱातील इतर तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहर तीन दिवस पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
दरम्यान जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलती रद्द केल्या आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंनाच सूट दिली आहे.