Covid-19: अमेरिकेचं झुकतं माप पुन्हा एकदा पाकिस्तान च्या पारड्यात!
X
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधं मिळवलं. त्यासाठी भारताला या औषधावरील निर्यात बंदी उठवावी लागली. मात्र, ज्या अमेरिकेसाठी भारताने हे सर्व केलं त्याच अमेरिकेने आपलं झुकतं माप पाकिस्तानच्या पारड्यात टाकलं आहे.
जगावर कोरोना व्हायरस चं संकट ओढवल्यानंतर अमेरिकेने जगातील अनेक देशांना आरोग्य सहाय्यता निधी जाहीर केला आहे. अमेरिकेच्या परदेश मंत्रालय आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने आपातकालीन स्वास्थ, आर्थिक सहायता करता ५०८ मिलियन डॉलर खर्च करणार आहे. त्या अंतर्गत भारताला आरोग्य सहाय्यता निधी म्हणून अमेरिकेने ५.९ मिलियन डॉलरची मदत केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला ९.४ मिलियन डॉलर ची मदत केली आहे. त्यामुळं अमेरिकेसाठी औषधावरील बंदी उठवू पाकला मदत केली असली तरी अमेरिकेने आपलं झुकतं माप नेहमी प्रमाणे पाकिस्तान च्या झोळीत टाकलं आहे. असं दिसून येतंय.
अमेरिकेने २० वर्षासाठी २.८ बिलियन डॉलरचा निधी सहायता निधी म्हणून जाहीर केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने १.४ बिलियन डॉलर निधी जगातील कोरोनाग्रस्त देशांना दिला आहे.
अमेरिकेने भारतासह अफगाणिस्तानला १८ मिलियन डॉलर, बांग्लादेश ९.६ मिलियन डॉलर, भूतानला ५ लाख डॉलर, नेपाळला १.८ मिलियन डॉलर, आणि श्रीलंका १.३ मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे.
डॉनाल्ड ट्रम्पने काय म्हटलं होतं?
“मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करु नये ?”