Home > News Update > दिलासा, हॉटस्पॉटची संख्याही १४ वरून ५ वर

दिलासा, हॉटस्पॉटची संख्याही १४ वरून ५ वर

दिलासा, हॉटस्पॉटची संख्याही १४ वरून ५ वर
X

राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी ७ दिवसांवर गेला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाले आहे असं टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आज ७११२ चाचण्या केल्या. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. राज्यात दररोज १३ टक्के रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत आणि केवळ एक टक्का रुग्ण अत्यवस्थ आहेत. एकूण रुग्णांपैकी ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत तर १७ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. त्यातील अनेक ठिकाणी आता रुग्ण नाहीत. त्यामुळे हॉटस्पॉटची संख्या कमी करत ५ वर आणण्यात आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील 7 वरून सरासरी 5 वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत.

Updated : 23 April 2020 8:16 AM IST
Next Story
Share it
Top