Home > हेल्थ > वीकेण्ड लॉकडाऊन सुरू, संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता आहे का?

वीकेण्ड लॉकडाऊन सुरू, संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता आहे का?

राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागणार का, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय सर्व प्रश्नांच्याबाबतीत आता लवकरच निर्णयाची शक्यता आहे.

वीकेण्ड लॉकडाऊन सुरू, संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता आहे का?
X

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. तसेच आता शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी असा वीकेण्ड लॉकडाऊन सुरू झाला आहे. पण याच पार्श्वभूमीवर राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावले जाणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. दहावी आणि बारीवीच्या परीक्षा, निर्बंध अधिक कडक करायचे या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊन अधिक कडक करावे लागेल असे म्हटले आहे.

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, सध्या राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. मात्र मुख्यमंत्री याबाबतीत निंर्णय घेतील. शुक्रवारी रात्रीपासून राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून संचारबंदीच्या काळात महत्वाचे काम असणाऱ्या नागरीकांसाठी बस, टॅक्सी, रिक्षा सुरूच राहतील. मात्र या वाहनांमधून प्रवास करताना सोशल डिस्टन्सींग पाळावे लागेल अही टोपे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राला रोज गरजेएवढ्या लसींचा साठा द्या अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

राज्यात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा उपलब्ध आहे. लसींचा साठा केंद्राकडून पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने ही वेळ आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात केवळ ३ टक्के लसींचा साठा वाया जात असून आम्हाला गरजेइतका लसींचा साठा द्यावा अशी मागणी केंद्राकडे केल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात सध्या रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता असून या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी दर महिन्याला या कंपन्यांकडून दीड लाख इंजेक्शन मिळणार असल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. शिवाय या इंजेक्शनचे दरही कमी करण्याबाबत कंपन्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Updated : 10 April 2021 7:44 AM IST
Next Story
Share it
Top