Bird Flu - अंडी, चिकन खाणे धोकादायक आहे का? पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्या महत्वपूर्ण सूचना....
गेली वर्षभर कोरोना महामारीच्या संकटाला झगडणाऱ्या प्रशासन व्यवस्थेला आता बर्ड फ्लू या संकटाचा सामना करावा लागत आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. “अंडी किंवा कोंबडीचे मांस हे जर ७० डिग्री अंशावर अर्धा तास शिजवलं तर हे जिवाणू जगू शकत नाहीत. तुम्ही जर अंडी तसेच अंड्यांचे इतर काही पदार्थ किंवा चिकन खाणार असाल तर अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे असं सुनिल केदार यांनी सांगितलं.
X
लोकांच्या सुरक्षेसाठी पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामध्ये "अंडी किंवा कोंबडीचे मास हे जर ७० डिग्री अंशावर अर्धा तास शिजवलं तर हे जिवाणू जगू शकत नाहीत. तुम्ही जर अंडी तसेच अंड्यांचे इतर काही पदार्थ किंवा चिकन खाणार असाल तर अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे अस सुनिल केदार यांनी सांगितलं.
तसेच परभणीतील मृत झालेल्या कोंबड्यांचे नमूने ज्या दिवशी तपासणीसाठी घेतले, तेव्हापासूनच तेथील जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित परिसर बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार कुठलाही पक्षी बाहेर जाणार नाही, तिथे काम करणाऱ्या लोकांनी देखील संपूर्ण वैद्यकीय तपासणी होत नाही तोपर्यंत बाहेर पडू नये व बाहेरच्या लोकांनी देखील तिथे जाऊ नये. अशा प्रकाच्या सूचना दिल्या होत्या याचे योग्य पालन गेलं गेलं असल्याचं देखील केदार यावेळी म्हणाले.
दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पशुरोग संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबई ठाणे परभणी बीड दापोली आणि रत्नागिरी मध्ये मृत पावलेल्या पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. बर्ड फ्लू आढळून आलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यामध्ये बडलू ग्रस्त पोल्ट्री या या खाण्यासाठी वापरल्या जाऊ नयेत यासंबंधीचे निर्देश परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना दिल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव अनुप कुमार यांनी सांगितले. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बर्ड फ्लूसाठी आढावा बैठक घेणार आहेत.Kedar