Home > News Update > Big News: डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार अजामीनपात्र गुन्हा, 2 लाखापर्यंतचा दंड

Big News: डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार अजामीनपात्र गुन्हा, 2 लाखापर्यंतचा दंड

Big News: डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार अजामीनपात्र गुन्हा, 2 लाखापर्यंतचा दंड
X

कोरोना व्हायरस च्या लढाईत सर्वात मोठी भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर, तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांवर अलिकडं हल्ले वाढले आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढं डॉक्टरांवर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. तर अमीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात Indian Medical Association ने केंद्र सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने तातडीने पाऊल टाकत डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफवर हल्ला केल्यास कडक शिक्षेची तरदूद असणारा अध्यादेश काढला आहे.

या संदर्भात बोलताना प्रकाश जावडेकर यांनी डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. अशी माहिती दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

काय आहे अध्यादेश?

डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद

जर कोणी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवर हल्ला केला तर 3 ते 5 वर्षे शिक्षेची तरतूद

नव्या अध्यादेशाअंतर्गत डॉक्टरांच्या मालमत्तेचं नुकसान केल्यास बाजार मूल्याच्या दुप्पट दंड आकारला जाणार

Updated : 22 April 2020 6:29 PM IST
Next Story
Share it
Top