Home > News Update > अन् डॉक्टरांचा हात बाळाने घट्ट धरला!

अन् डॉक्टरांचा हात बाळाने घट्ट धरला!

अन् डॉक्टरांचा हात बाळाने घट्ट धरला!
X

सर्वत्र परिस्थिती लॉकडाऊनची… कामाशिवाय घराबाहेर पडण्याची सोय नाही… अशातच अलिबागमध्ये राहणाऱ्या एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या आणि…

अलिबाग शहरातील 32 वर्षीय श्वेता केतन पाटील यांना अचानक प्रसूतीकळा सुरु झाल्या. श्वेता यांना तातडीने डॉ. वाजे नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. त्या मधुमेहाच्या रुग्ण होत्या. औषधं नियमितपणे चालू असून शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात होते.

श्वेता यांचं पहिले बाळ प्रसूतीनंतर काही कारणास्तव दुसऱ्या दिवशीच दगावलं होतं. यावेळीही पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालल्यामुळे डॉ. चंद्रकांत वाजे यांनी श्वेता यांचं तातडीने सिझरींग करण्याचा निर्णय घेतला. बाळाविषयी वेळीच खबरदारी घेता यावी म्हणून शहरातील प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनाही तात्काळ बोलावण्यात आलं. या संदर्भात माय मेडिकल मंत्राने सविस्तर वृत्त दिलं आहे.

या महिलेचं यशस्वीपणे सिझर झालं, त्यांची तब्बेत व्यवस्थित होती. नुकतचं जन्माला आलेलं बाळ रडलंही. पण थोड्या वेळातच हे बाळ काळ/निळं पडलं व बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, क्षणाचाही विलंब न लावता बाळाला तातडीने एन.आय. सी. यू. मध्ये दाखल करण्याचा डॉ. चांदोरकर यांनी निर्णय घेतला.

The total number of COVID-19 in world, The total number of COVID-19 in Mumbai, The total number of COVID-19 in Maharashtra,
The total number of COVID-19 in USA, The total number of COVID-19 in UAE, The total number of COVID-19 in Italy, coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

सगळीकडे लॉकडाऊन, रस्त्यावर कुठलेही वाहन नाही, अशा बिकट परिस्थितीत कोणतेही वाहन मिळेना. बाळाची तब्येतही खालावत चाललेली पाहून डॉ. चांदोरकरांनी बाळ व बाळाची मावशी यांना आपल्याच दुचाकी वाहनावरून त्यांच्या आनंदी हॉस्पिटल मध्ये आणून बाळावर तातडीने योग्य ते उपचार सुरु केले. काही वेळ बाळ ऑक्सिजनवर होते. डॉ.वाजे, डॉ.चांदोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाने व झटपट केलेल्या कृतीने आता हे बाळ एन. आय. सी. यू. मध्ये सुरक्षित आहे.

प्रसंगावधान ठेवून डॉ.चांदोरकरांनी त्या बाळाला तात्काळ आपल्या दुचाकी वाहनावरुन एन.आय.सी.यू दाखल केलं. त्यावर तातडीने आवश्यक ते उपचार केले आणि त्यामुळेच त्या बाळाचा जीव वाचला.

दरम्यान बाळाच्या तब्येतीची फेरतपासणी करतेवेळी डॉक्टरांचा हात त्या बाळाने घट्ट धरला होता….. तेव्हा त्या बाळाच्या स्पर्शाने या कोविड 19 च्या संवेदनशील काळात डॉ.चांदोरकर यांना अक्षरश: गहिवरून आले.

Updated : 11 April 2020 9:45 AM IST
Next Story
Share it
Top