खान्देशात कोरोनाचे १०२ रुग्ण, २० जणांचा मृत्यू
X
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिन्ही जिल्ह्यातील कोरोनाबाधीत एकूण रुग्णांची संख्या आता 102 वर पोहचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव
जिल्ह्यात ७ जणांच्या तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक व्यक्ती जळगाव शहरातील आहे, एक व्यक्ती चोपडा तालुक्यातील अडावद इथली आहे, तर एक महिला आणि एक पुरूष पाचोरा आणि अमळनेरमधील तिघांचा यात समावेश आहगे. या एकूण सात जणांपैकी ५ पुरूष तर २ महिला आहेत. यात 13 वर्षांचा मुलगा, 23 वर्षांचा तरूण आणि 16 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. यापैकी जळगाव शहरात सापडलेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 52 झाली आहे. त्यापैकी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे
धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 23 रुग्ण हे धुळे शहरातील आहेत.
नंदुरबार
नंदुरबार जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असला तरी रोज नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असल्याने रेड झोनमध्ये जाण्याची श्यक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 19 वर पोहचली आहे. रविवारी नंदुरबार तालुक्यातील नटावद इथल्या 31 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मालेगाव इथे बंदोबस्तासाठी गेलेल्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.
खान्देशातील कोरोनाबाधीतांची संख्या- 102
जळगाव - 52
धुळे - 31
नंदुरबार - 19