ऋतुचर्या
X
ऋतुचर्या चा अर्थ आहे ऋतुंच्या अनुसार पथ्यापथ्याचे सेवन करणे. अथवा ऋतुनुसारच राहणीमान आणि जीवनचर्येचे पालन करणे. पूर्ण वर्षाला आयुर्वेदामध्ये २ काळांमध्ये (काल ) विभक्त केले आहे -
१ - आदान काल
२ - विसर्ग काल
आदान काळामध्ये पृथ्विचा उत्तर ध्रुव (north pole) सूर्याकडे झुकतो. पृथ्वीच्या ह्या क्रियेमुळे धरतीवर सूर्याची गती उत्तर दिशेला असते. त्यामुळे त्याला उत्तरायण (आयन अर्थात गती) असे म्हटले जाते. आदानचा अर्थ आहे ‘घेणे’. हा तो काळ आहे ज्या काळात सूर्य आणी वायू आपल्या परमावस्थेत येतात. ह्या काळात सूर्य पृथ्वीची सर्व उर्जा आणी थंडावा काढुन घेतो. त्यामुळे ह्या काळात शरिरामध्ये कमजोरी येऊ लागते.
दूसरा काळ आहे विसर्गकाळ. ज्यामध्ये पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेला असतो. त्यामुळे सूर्याची गती दक्षिणेला असते. म्हणुनच ह्या काळाला ''दक्षिणायण'' सुध्दा संबोधले जाते. ह्या काळालाच ''विसर्गकाळ'' असेही बोलले जाते. विसर्गचा अर्थ आहे ''प्रदान करणे-देणे''. ह्या काळात सूर्य धरतीला उर्जा प्रदान करतो.
विसर्गकाळात चंद्राचे प्राधान्य असते. असे वाटते की चंद्रच पुर्ण, धरतीवर नियंत्रण करतो आहे. सर्व वनस्पती आणी प्राण्यांना चंद्र पोषण प्रदान करतो. पृथ्वीवर ढग, पाऊस आणि वारा ह्यामुळे थंडावा निर्माण होतो. एका वर्षात दोन ''आयन'' असतात. दक्षिणायण आणि उत्तरायण. आणि ह्यांच्यामुळेच वर्षामध्ये ६ ऋतू असतात आणि प्रत्येक ''आयनामध्ये ३ ऋतू असतात.
आदान काल मध्ये
शिशिर,
वसंत
ग्रीष्म
विसर्ग काल मध्ये
वर्षा,
शरद
हेमंत.
प्रत्येक ऋतु दोन महिन्यांचा असतो.
आदान काल (उत्तरायण)
शिशिर -माघ, फाल्गुन
15 जानेवारी-15 मार्च
वसंत-चैत्र, वैशाख
15 मार्च- 15 मे
ग्रीष्म-ज्येष्ठ, आषाढ़
15 मे- 15 जुलॆे
विसर्ग काल (दक्षिणायन)
वर्षा-श्रावण, भाद्रपद
15 जुलॆे 15 सप्टेंबर
शरद-आश्विन, कार्तिक
15 सप्टेंबर 15 नोव्हेंबर