Home > Governance > महिला दिनाची एक फेसबुक पोस्ट:विधीमंडळात दखल आणि धामोळे गावचा पाणी प्रश्न सुटला

महिला दिनाची एक फेसबुक पोस्ट:विधीमंडळात दखल आणि धामोळे गावचा पाणी प्रश्न सुटला

महामुंबईतील खारघर गोल्फ कोर्सच्या पलीकडे आहे धामोळे नावाचे आदिवासी गाव... पाण्यापासून वंचित होतं.. ९ मार्च रोजी एका पत्रकारानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली अखेर आज विधीमंडळात चर्चा होऊन खारघरमधील धामोळे गावाचा पाणी प्रश्न सुटला आहे.

महिला दिनाची एक फेसबुक पोस्ट:विधीमंडळात दखल आणि धामोळे गावचा पाणी प्रश्न सुटला
X

देशाची आर्थिक राजधानी मुंबईजवळील (Mumbai) महामुंबई परीसरातील सुनियोजीत खारघर (Kharghar) तसा अतिशय विकसित आणि सुनियोजित परिसर. कोट्यवधी किमतीची घरे,प्रशस्त रस्ते आणि शेकडो एकरात पसरलेले मैदान ही खारघर ची ओळख. सेंट्रल पार्क जवळपास 300 एकर चा परिसर आहे ! त्यापुढे आहे 250 एकरचा गोल्फ कोर्स. या गोल्फ कोर्सच्या पलीकडे आहे धामोळे नावाचे आदिवासी गाव पाण्यापासून वंचित होतं.. ९ मार्च रोजी एका पत्रकारानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली अखेर आज विधीमंडळात चर्चा होऊन खारघरमधील धामोळे गावाचा पाणी प्रश्न सुटला आहे.


महामुंबईतील खारघर गोल्फ कोर्सच्या पलीकडे आहे धामोळे नावाचे आदिवासी गाव... पाण्यापासून वंचित होतं.. ९ मार्च रोजी एका पत्रकारानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली अखेर आज विधीमंडळात चर्चा होऊन खारघरमधील धामोळे गावाचा पाणी प्रश्न सुटला आहे.महामुंबईतील खारघर गोल्फ कोर्सच्या पलीकडे आहे धामोळे नावाचे आदिवासी गाव... पाण्यापासून वंचित होतं.. ९ मार्च रोजी एका पत्रकारानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली अखेर आज विधीमंडळात चर्चा होऊन खारघरमधील धामोळे गावाचा पाणी प्रश्न सुटला आहे.

आधुनिकतेच्या जगात सोशल मिडीया हा वायफळ समजला जातो. परंतू परीणामकारक वापर केला तर प्रश्नही सुटू शकतात हे या प्रकरणावरुन दिसून आले आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांना ९ मार्च महीला दिनी धक्का बसला होता. ते म्हणाले, मी खारघरच्या सेंट्रल पार्क मधून प्रभात भटकंती करून बाहेर पडताना माझे लक्ष पार्क बाहेर पाणी पिण्यासाठी असलेल्या नळाकडे गेले. एक महिला आणि मुलगी हंड्यात पाणी भरताना दिसले.


नंतर भरलेला हंडा डोक्यावर ठेवून मुलगी चालत निघाली. त्यानंतर महिलाही हंडा घेऊन निघाली. आजूबाजूला उंचच उंच इमारती असताना आणि जवळपास कुठेही झोपडपट्टी नसताना डोक्यावर हंडा घेऊन या महिला कुठे जात आहेत ? या उत्सुकतेपोटी महिलेशी बोललो. त्यानंतर महिलेच्या उत्तरानंतर मला धक्का बसला. "आमच्या गावात पाईपलाईन नाही प्यायला पाण्यासाठी आम्हाला इकडे यावे लागते. राजकारणी, प्रशासक यांना सांगून थकलो मात्र कुणीही काहीही केले नाही," असे ग्रामीण भाषेत बोलताना या महिलेने सांगितले.

देशभर महिला दिन साजरा झाला मात्र या कष्टकरी आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी जेव्हा काही किमीची पायपीट करावी लागणार नाही तो खरा महिला दिन ! पनवेल मनपा, सिडको आणि राज्यशासन यात लक्ष घालेल का ? असा प्रश्न चिंचूवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

खारघर मधील सेंट्रल पार्क जवळपास ३०० एकर चा परिसर आहे. त्यापुढे २५० एकरचा गोल्फ कोर्स आहे. या गोल्फ कोर्सच्या पलीकडे धामोळे नावाचे आदिवासी गाव आहे. श्रीमंतांच्या गोल्फ कोर्स मध्ये शेकडो एकरात पाणी फवारले जात असले तरी सिडकोच्या कृपेने त्याला लागून असलेल्या धामोळे या आदिवासी बहुल गावात पाईप लाईन अद्याप पोहोचलेली नसल्याचा मुद्दा आज विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरीषद सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

Updated : 20 March 2023 6:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top