Fact Check : दाऊद सोबत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचा फोटो खरा आहे का?
अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमसोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचा कथित फोटो व्हायरल होत आहे. पण या फोटोत दिसत असलेली महिला सुप्रिया श्रीनेत आहेत का? काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक...
X
सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमसोबत एका महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दाऊदसोबत असलेली महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुप्रिया श्रिनाते असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात @ppagarwal यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ये कौंन है @SupriyaShrinate जी बताओ जरा.
या ट्वीटला ५८८ रिट्विट तसेच ३६ कोट करण्यात आले आहेत. हे ट्वीट ६६.८ हजार लोकांनी पाहिले आहे. तसेच १ हजार ३६५ लोकांनी हे ट्विट लाईक केले आहे. ( Archived - https://twitter.com/ppagarwal/status/1669383250979225602?s=20 )
स्वामी रामसरनाचार्य पांडे यांनी हाच फोटो ट्वीट करत म्हणाले की, भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम यांच्यासोबत ही मुलगी कोन आहे. या महिलेचे दाऊदसोबत घनिष्ठ संबंध का आहेत? असं म्हणत काँग्रेस आणि सुप्रिया श्रिनेत यांना टॅग केले आहे.
भारत का मोस्टवांटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम के साथ यह लड़की कौन है और इस डाॅन के साथ इस महिला के घनिष्ठ संबंध क्यों हैं ???? @SupriyaShrinate @INCIndia @INCMP @OfficeOfKNath @INCChhattisgarh @INCRajasthan @BJP4India pic.twitter.com/4oq15oiWgL
— Swami Ramsarnacharya Pandey, मेलकोटे पीठाधीश्वर (@SwamiRamsarnac4) June 15, 2023
अशाच प्रकारे अनेक वापरकर्त्यांनी याच दाव्यासह ट्वीट केले आहेत. (Archived link- 1, 2, 3)
यानंतर मॅक्स महाराष्ट्रने हा फोटो रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केला. तर त्यात फेसबुक आणि ट्विटरवर अशाच दाव्याने फोटो पोस्ट केले जात आहेत.
पडताळणी ( Reality Check)
या व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसणारी महिला काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रिनेत नाहीत. तर पत्रकार शीला भट्ट आहेत. यासंदर्भातील फोटो शीला भट्ट यांनी 14 जून 2023 रोजी शेअर केला होता. त्यामध्ये शीला भट्ट यांनी म्हटले होते की, 1987 मध्ये दुबई येथील पर्ल बिल्डिंगमध्ये दाऊद इब्राहिमची मुलाखत घेताना.
त्यामुळे दाऊद इब्राहिमसोबत फोटोत दिसत असलेली महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रिनेत नाहीत तर त्या ज्येष्ठ पत्रकार शीला भट्ट आहेत. यानंतर शीला भट्ट यांनी एक ट्वीट करून म्हटले की, दाऊद इब्राहिमची मुलाखत ‘अभियान’ आणि ‘द इलस्ट्रेटेड वीकली’ या मासिकात प्रसिध्द झाली होती. ही मुलाखत 1987 मध्ये दाऊद इब्राहिम सोबत माझी मुलाखत छापली होती. विकलीची कव्हर स्टोरी प्रसिध्द पत्रकार अमृता शाह यांनी लिहीली होती. माझी मुलाखत त्यांच्या कव्हर स्टोरीसह प्रसिध्द झाला होती. दाऊदचे सर्व फोटो मी घेतले होते.
सुप्रिया श्रिनेत यांनी अल्ट न्यूजला यासंदर्भात प्रतिक्रीया दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझी जन्म तारीख 27 ऑक्टोबर 1977 आहे. त्यामुळे अवघ्या 10 व्या वर्षी बसून मी दाऊदची मुलाखत करू शकत नाही.
What is Fact ?
त्यामुळे वरील सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दाऊदसोबत दिसणारी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रिनेत नसून पत्रकार शीला भट्ट आहेत. त्यामुळे खोडसाळपणे आणि चुकीच्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.