Fact check: खरंच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी पळवून लावले का?
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदाचा अमेरिका दौरा खास चर्चेत होता. कारण 'अब की बार डोनाल्ड ट्रम्प सरकार' असा नारा मोदी यांनी अमेरिकेतील निवडणुकांच्यावेळी दिला होता. त्यानंतर मोदी यांच्या नाऱ्याला अमेरिकन नागरिकांनी केराची टोपली दाखवत जो बायडन यांना निवडून दिलं. त्यातच कोरोना महामारीमुळे मोदींचे विदेशी दौरे बंद होते. त्यामुळे यंदाचा अमेरिका दौरा खास चर्चेत होता. मात्र, या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर दररोज नवनवीन दावे केले जात आहेत.
अमेरिकी इतिहास में कभी भी भारतीय प्रधानमंत्री को पब्लिक ने दौड़ा-दौड़ा कर नहीं भगाया था।
— Zohair malkapurwala (@Zoher89751009) September 29, 2021
अमेरिकी फ़ौज मोदी को लेकर उल्टे पॉव भागी
🌾 अमेरिका किसान एकता जिंदाबाद 🌾
मोदी की अमेरिका में किसानों के आगे भागने की बेज़ती जरूर देखें । 👇👆 pic.twitter.com/nmBu1bUibq
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेत लोकांमी पळून लावलं. हा दावा केला जात आहे. अमेरिकेत शेतकरी एकतेसमोर मोदी यांना बेइज्जत होण्याची वेळ आली. अशा दाव्यासह फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
यासंदर्भात ऑल्ट न्यूज फॅक्ट चेक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील क्वाड परिषदेचा दौऱ्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत माध्यमांची नजर होती. याच्या बातम्याही बातम्यांवर झळकळल्या. आता अशी सगळी परिस्थिती असताना अमेरिकेत मोदी यांच्या विरोधात लोक रस्त्यावर आली असं झालं असतं माध्यमांनी ते कव्हर केलंच असतं.
हा व्हिडिओ 21 सप्टेंबर पासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर उपलब्ध आहे. आणि पंतप्रधान मोदी 22 सप्टेंबरला (US) अमेरिकेला रवाना झाले होते. याचा अर्थ या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओशी पंतप्रधान मोदींचा काही संबंध नाही. 21 सप्टेंबरला एका ट्विटर यूझर ने हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मधला आहे असं सांगून शेअर केला होता.
Crazy scenes in Melbourne CBD 😳🤯 #melbourneprotests #MelbourneRiots pic.twitter.com/km1VD74ofm
— ⚫️⚪️ JAKE ⚫️⚪️ (@IncrediblyBozza) September 21, 2021
आणखी एका नेटिझन्सने हा व्हिडिओ 21 सप्टेंबरला शेअर केला आहे.
या व्हिडिओत दाखवल्या जाणाऱ्या जागा आम्ही गुगल मॅपच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला. असता हे मेलबर्न मध्ये व्हिक्टोरियाचे एक्जीब्युशन ST आहे. जिथे प्रदर्शन होत आहे. तसेच समोरच ओरिजिन एनर्जी ची बिल्डिंग दिसत आहे.
एका वृत्तानुसार मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मध्ये लॉकडाउन च्या विरोधात अनेक दिवसांपासून प्रदर्शन होत आहे. इथे फक्त त्याच लोकांना काम करण्याची परवानगी आहे, ज्यांनी दोन लस घेतल्या आहेत. त्यामुळे याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहे. दरम्यान या आंदोलनात आतापर्यंत 72 लोकांना अटक झाली आहे.
निष्कर्ष:
ऑस्ट्रेलिया चा हा व्हिडियो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याशी जोडून खोट्या माहितीचा प्रसार केला जात आहे.
या संदर्भात Alt news ने Fact Check केलं आहे.
https://www.altnews.in/video-of-melbourne-protest-shared-as-protest-against-pm-modis-us-visit/