Fact check : UP पोलिसांनी रस्त्यावर खरंच नमाज पठण करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज केला ?
X
सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये पोलिस काही लोकांवर लाठीचार्ज करत आहेत. असा दावा केला जातोय की UP मध्ये एक नवा कायदा बनवला गेला आहे ज्यानूसार, UP च्या रस्त्यावर नमाज पठण करण्यास बंदी घालण्यत आली आहे. हा व्हिडिओ UP चा असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ट्विटर युजर रेणुका जैन यांनी हा व्हिडिओ UP चा असल्याचे सांगत शेअर केला.
No namaz on roads. We need more yogi in India pic.twitter.com/rWe4JiCpPd
— #RenukaJain (@RenukaJain6) October 25, 2021
फेसबुक युजर श्रीकांत स्वामी यांनी हा व्हिडिओ याच दाव्यानुसार पोस्ट केला. हा लेख लिहुन होईपर्यंत या व्हिडिओला १४ हजार व्ह्युज आले आहेत.
फेसबुक आणि ट्विटर वर अनेक लोकांनी हा व्हिडिओ UP चा असल्याचे सांगत शेअर केला आहे.
काय आहे सत्य?
व्हायरल पोस्टवर एका युजरने कमेंट करून हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील असल्याचे सांगितले आहे. या कमेंटच्या आधारे की-वर्ड्स सर्च केल्यानंतर १९ ऑक्टोबरचा MP तक चा व्हिडिओ सापडला. रिपोर्ट्सनूसार, जबलपूरमध्ये मिलाद उन-नबी चे औचित्य साधून उरूस काढण्यात आला होता. यादरम्यान स्थानिक पोलिस आणि उरूसमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांमध्ये वाद झाले होते. ज्यामुळे लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती आणि त्यामुळे मग पोलिसांनी या लोकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वर्षाव केला होता.
या रिपोर्ट मध्ये एका जागी आम्हाला तीच दुकाने दिसली जी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ही बाब आपण खाली देखील पाहू शकता.
व्हायरल व्हिडिओमध्ये पुढे आम्हाला आणखी एका दुकानाचे फलक दिसले ज्यावर 'एस दीन टेलर्स' लिहिलेलं दिसून येतं. गूगल मॅप्स वर सर्च केल्यानंतर आम्हाला आढळून आले कि जबलपूर च्या गोहलपुर मध्ये याच नावाचे एक दुकान अस्तित्वात आहे.
जबलपूरच्या या विवादाबद्दल आणखी काही वृत्तसमुहांनी रिपोर्ट्स शेउर केले आहेत. (लिंक१) (लिंक२) (लिंक३) (लिंक४)
नवभारत टाइम्सच्या लेखानूसार, ईद च्या मुहूर्तावर उरूसाचा मार्ग मासळी बाजार ते सुब्बा शाह मैदान असा होता. परंतू मासळी बाजारापर्यंत पोहोचताच उरूसात सहभागी असलेल्या काही लोकांनी पोलिसांचे बॅरिकेड हटवण्याचे प्रयत्न केले. याचदरम्यान कुणीतरी पोलिसांवर दगडफेक केली आणि फटाके फेकले. यानंतर मग पोलिसांनी देखील लाठीचार्ज सुरू केला. काही पोलिस अधिकारी देखील जखमी झाले.
मग आम्ही उत्तर प्रदेश मध्ये रस्त्यांवर नमाज पठणावर कोणते निर्बंध लावले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी की-वर्ड्स सर्च केले. ऑजस्ट २०१९ मध्ये UP पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठण किंवा आरती यासारख्या धार्मिक गोष्टी करण्यावर निर्बंध लावले होते. हे निर्बंध रस्त्यावर होणारी ट्रॅफीक लक्षात घेऊन लावण्यात आले होते.
निष्कर्षः
एकंदरीत, मध्यप्रदेशच्या जबलपुर मध्ये ईद च्या दिवशी निघालेला उरूस आणि स्थानिक पोलिसांमध्ये हिंसा घडली होती. हा व्हिडिओ UP मध्ये पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना मारहाण केली या खोट्या दाव्यासह शेअर केला गेला.
या संदर्भात Alt News ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/fact-check-video-of-jabalpur-mp-shared-as-up-police-beating-people-who-offering-namaz-on-road/