Fact Check: पायाला बेडी घातलेला फोटो स्टेन स्वामींचा आहे का?
स्टेन स्वामींना पोलिसांनी अशा प्रकारे बांधून ठेवलं होतं का? काय आहे फोटोमागील सत्य?
X
मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांचं न्यायालयीन कोठडीत ५ जुलैला रोजी निधन झालं. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांचा हात असल्याचा आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप स्टेन स्वामी यांच्यावर करण्यात आला होता. तसेच यूएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दम्यान स्टेन स्वामी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच ही 'हत्या' असल्याचा आरोप सुद्धा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. तर दुसरीकडे माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी कोठडीत असलेल्या स्टेन स्वामी यांच्या 'मृत्यूची जबाबदारी निश्चित करावी' अशी मागणी केली आहे. दरम्यान स्टेन स्वामींच्या मृत्यूनंतर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. फोटोमध्ये रुग्णालयाच्या बेडवर असलेल्या एक वृद्ध व्यक्तीच्या पायाला बेड्यांनी बांधलं असल्याचं दिसून येत आहे. तसेच फोटोतील व्यक्ती ही स्टेन स्वामी असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे.
A country that can spend thousands of crores to buy aircraft for it's PM, build useless CentralVista in current scenario didn't have money to buy straws for an old man suffering from Parkinson Disease who was jailed maliciously RIP #StanSwamy You've been victim of law & govt! pic.twitter.com/OeyhB7XmRr — 𝕱𝖆𝖊𝖖𝖚𝖊 | فائق | फ़ाएक़ (@Fa__ek) July 5, 2021
अनेकांनी हा फोटो ट्विट करत स्टेन स्वामी यांची हत्या भारत सरकार आणि न्यायालयीन यंत्रणेने केली असल्याचं म्हंटलं आहे.
शर्मनाक तश्वीर..😭 #StanSwamy जी के उम्र का तो ख्याल रखते🙏 विनम्र श्रद्धांजलि pic.twitter.com/NKrxuVyHFk — Nikhil Kumar 🇮🇳 (@nikhilkumarIND) July 5, 2021
फेसबुक यूजर राजीव ध्यानी यांनी हा फोटो शेअर केला आहे. पण हे स्टेन स्वामी असल्याचं त्यांनी म्हंटलेल नाही. मात्र, अनेक लोकांनी हे स्टेन स्वामीच असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे सत्य...
हा रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केल्यानंतर या फोटोची सत्यता समोर आली. हा फोटो मे २०२१ चा असून फोटो मधील वृद्ध व्यक्तीचं नाव बाबूराम बलवान सिंग आहे. त्यांना एका हत्येप्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी एटा जेलमध्ये आणण्यात आलं होतं. ते कुल्हा हवीवपूरचे रहिवासी आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने १४ मे २०२१ रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार, एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ९२ वर्षीय बाबूराम बलवान सिंग यांची ९ मे रोजी तब्येत बिघडल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंजाब केसरीच्या एका रिपोर्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. एटा जिल्हा कारागृहातील जेलर कुलदीपसिंग भदौरिया यांनी या प्रकरणात कामगाराला निलंबित केलं आहे. ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी वृद्ध कैद्याच्या एका पायाला बेड्यांनी बंद केलं, व साखळी रुग्णालयातील बेडला लॉक केली. दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अतिरिक्त महासंचालक (तुरूंग) आनंद कुमार यांनी तुरूंगातील कामगार अशोक यादव यांना निलंबित केलं होतं.. सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबत जाब ही मागितला आहे.
रुग्णालयातील डॉक्टर सौरभ यांनी पंजाब केसरीला सांगितलं की, बाबूराम हे मानसिक समस्येने ग्रस्त होते तसेच ते वारंवार बेडवरुन उठून पळून जायला पाहायचे. मात्र, वारंवार पळून जाण्याचे प्रयत्न करत असतांना त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून त्यांना बांधून ठेवण्यात आलं.
निष्कर्ष
एकूणच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ९२ वर्षीय बाबूराम बलवान सिंग यांचा फोटो स्टेन स्वामींचा सांगत शेअर केला जात आहे.