Fact Check: रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या उपराष्ट्रपतींची पत्नी खरंच लढत आहे का?
Fact Check: रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या उपराष्ट्रपतींची पत्नी खरंच लढत आहे का? काय आहे व्हायरल फोटोची सत्यता?
X
रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या उपराष्ट्रपतींची पत्नी लढत असल्याचा दावा केला जात आहे. एका महिला सैनिकाचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. या फोटोतून ही महिला उपराष्ट्रपतींची पत्नी असल्याचा दावा केला जात आहे.
ट्वीटर युजर @IAmAarav8 ने हे छायाचित्र ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटला हजाराहून अधिक युजरने रिट्विट केले आहे.
हा फोटो अनेक फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. खालील फोटोवरून तुमच्या ही बाब लक्षात येईल. (लिंक १, लिंक २)
काय आहे सत्य? What is reality?
रिव्हर्स इमेज सर्चवर या संदर्भात माहिती मिळण्याचा प्रयत्न केला असता Alt न्यूजला Alamy या छायाचित्रांच्या वेबसाईटवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या वेबसाईटवर छायाचित्रासह दिलेल्या माहितीनुसार, कीवमधील ख्रेश्चाटिक स्ट्रीटवर स्वातंत्र्य दिनाच्या परेडपूर्वी रिहर्सल दरम्यान हा फोटो काढण्यात आला होता. गेल्या वर्षी युक्रेनने स्वातंत्र्याची तीन दशके साजरी केली होती. हे छायाचित्र कोणाचे आहे. हे या फोटोसोबत सांगण्यात आलेले नाही.
युक्रेनमध्ये उपराष्ट्रपती पद नाही...
युक्रेन सरकारच्या वेबसाइटनुसार देशात उपराष्ट्रपती पद नाही. या वेबसाइटवर युक्रेनमधील प्रमुख लोकांची यादी दिली आहे. 'युक्रेनचे उपाध्यक्ष' असा शोध देखील आम्ही Google वर घेतला. मात्र, आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.
निष्कर्षः
एकूणच, युक्रेनमधील एका महिला सैनिकाचे छायाचित्र खोट्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे. फेसबुक पेज '香港地' आणि 'Veteran Up' ने देखील हाच दावा करत वेगवेगळी छायाचित्र पोस्ट केली आहेत.
या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केले आहे. https://www.altnews.in/hindi/old-image-of-female-ukrainian-soldier-shared-as-wife-of-ukrainian-vp/