Home > Fact Check > Fact Check: सबरीमाला मंदिरातील प्रसाद इस्लामिक कंपनी तयार करते?

Fact Check: सबरीमाला मंदिरातील प्रसाद इस्लामिक कंपनी तयार करते?

Fact Check: सबरीमाला मंदिरातील प्रसाद इस्लामिक कंपनी तयार करते?
X

सबरीमाला मंदिरातील प्रसाद इस्लामिक कंपनी तयार करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'इंदू मक्कल कच्ची' या ट्विटर यूजरने अरावणा पायसमचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील प्रसादाच्या पाकिटावर अल झाहा स्वीट्स असं देखील लिहिलेलं दिसून येत आहे. अरावणा पायसम हा सबरीमाला मंदिराचा प्रसाद आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, सबरीमाला येथे वाटण्यात येणारा प्रसाद अरावणा पायसम हा केवळ इस्लामिकच नाही तर हलालही आहे. त्याचे नावही अरबी आहे.

दरम्यान, 'RSS: Evolution from an Organization to a Movement' या पुस्तकाचे लेखक रतन शारदा यांनीही हा फोटो ट्विट केला आहे.

यासोबतच, फेसबुक यूजर रामयार श्रीनिवासन नावाच्या एका यूजरच्या पोस्टचा स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या पोस्टमध्येही हाच दावा करण्यात आला आहे. मात्र, हे खाते खाजगी आहे.





अनेक फेसबुक युजर्सने हा फोटो शेअर करत हाच दावा केला आहे.





काय आहे सत्य...?

केरळ सरकारच्या वेबसाईटवर शबरीमाला येथे दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या लिस्ट दिली आहे. तसेच या प्रसादाची डिलिव्हरी इंडिया पोस्ट द्वारे केली जाऊ शकते. असं सांगितलं आहे.



दरम्यान, प्रसादाच्या पेटीचा फोटो इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. याशिवाय, रिलिजन वर्ल्ड वेबसाइटवर देखील प्रसादाच्या बॉक्सचा मोठा फोटो आहे. खालील चित्रात आपण पाहू शकता की, प्रसादाच्या बॉक्सवर 'Travancore Devaswom Board' असं लिहिलेले आहे, अल झाहा स्वीट्स असं नाही. आणि बॉक्सच्या तळाशी अरावण प्रसाद लिहिलेलं आहे.




दरम्यान, अल झाहा स्वीट्सचा शोध घेतला असता, रशियन मॅप सर्व्हिस 2GIS ची एक लिंक सापडली. त्यानुसार अल झाहा स्वीट्स हे दुबईमधील एक मिठाईचे दुकान आहे. आम्हाला कंपनीचा व्हॉट्सअॅप नंबरही मिळाला. संभाषणादरम्यान, आम्हाला सांगण्यात आले की, त्यांच्या कंपनीने कधीही सबरीमाला येथे त्यांची उत्पादने पाठवली नाहीत.

एवढंच, नाही तर, अल झाहा स्वीट्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, रशीद यांनी द क्विंटला सांगितले की, 'अरवण पायसम' या त्यांच्या लोकप्रिय उत्पादनाचा कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाशी काहीही संबंध नाही. तसेच, त्यांचा भगवान अयप्पा किंवा सबरीमालाशी देखील काही संबंध नाही. यासोबतच आमच्या कंपनीचा भारत किंवा केरळमधील कोणत्याही कंपनी किंवा बोर्डाशी कोणताही करार नाही.




अशी माहिती त्यांनी द क्विंट या वेबसाईटला दिली आहे.

दरम्यान, द क्विंटच्या रिपोर्टमध्ये त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे आयुक्त बीएस प्रकाश यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला दावा खोटा आहे. मंदिरातील अधिकारीच प्रसाद बनवतात. हे काम कोणत्याही कंपनी किंवा संस्थेला देण्यात आलेले नाही.

निष्कर्ष:

एकंदरीत, सोशल मीडियावर एक खोटा दावा शेअर केला जात आहे की, सबरीमाला मंदिरामध्ये अर्पण केला जाणारा प्रसाद इस्लामिक कंपनीद्वारे तयार केला जातो.

या संदर्भात Alt news ने वृत्त दिलं आहे. https://www.altnews.in/hindi/false-claim-sabarimala-temple-aravana-prasadam-is-made-by-uaes-al-zahaa/

Updated : 19 Nov 2021 12:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top