Fact Check: मोदी हरवले आहेत, ही जाहिरात खरी आहे का?
X
भारताला सध्या कोरोनाशी कडवी झुंज द्यावी लागत आहे. या लढाईमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. परदेशातील काही वृत्तपत्रांनी पंतप्रधान मोदी हे कोरोनाची लढाई लढण्यात अपयशी ठरले असल्याची कठोर शब्दात टीका केली आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हरवले आहेत. अशी जाहिरात 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्त पत्रात प्रसिद्ध झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे वृत्तपत्रातील जाहिरात?
सध्या 'हिंदुस्थान टाईम्स' या वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हरवले आहेत. अशा आशयाची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीचा मजकूर
भारताचे पंतप्रधान, गंगेचे पुत्र, त्यांना प्रधान सेवक म्हणूनही ओळखलं जातं. ज्यांची छाती 56 इंचाची आहे. पांढऱ्या रंगाची वाढलेली दाढी, मोठ्या उद्योगपतींच्या सहवासात राहतात. ज्यांना मोर आवडतात.
असं वर्णन असलेले पंतप्रधान हरवले आहेत. अशी जाहिरात देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
Valaipechu J Bismi या तमिळ पत्रकारांचं प्रोफाइल असणाऱ्या व्यक्तीने हा फोटो 13 मेला ट्वीट केला असून या फोटोला शेकडो लोकांनी लाईक केलं आहे.
#missingmodi pic.twitter.com/cQQmewDgRq
— Valaipechu J Bismi (@jbismi14) May 13, 2021
त्याच बरोबर हा फोटो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल झाला आहे.
தோழன் உதய குமார் कॉम्रेड उदय कुमार या व्यक्तीने देखील हा फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
பிரியகுமரன் प्रियकुमारन या व्यक्तीने देखील हा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोचं कॅप्शन #MissingModiअसं देण्यात आलं आहे.
#MissingModi pic.twitter.com/Fv5nfY1aFk
— பிரியகுமரன் (@kumaranofficia) May 14, 2021
काय आहे सत्य?
या वृत्तपत्राच्या हेडलाईन वरुन या शब्दांचा वापर करुन आम्ही या वृत्तपत्राची हेडलाईन सर्च केली असता. ती हिंदूस्थान टाइम्सची असल्याचं निदर्शनात आलं. त्यानंतर या बातमीवरुन हे वृत्त हिंदूस्थान टाइम्सला 7 मेला प्रसिद्ध झालं आह
ex… Can add 9,000 beds if O2 quota is met: Arvind Kejriwal
ही बाब लक्षात आल्यानंतर यावरुन आम्ही epaper.hindustantimes.com या संकेत स्थळावर जाऊन 7 मे, 2021 चा हिंदूस्थान टाइम्स पेपर शोधला. या वृत्तपत्रातमध्ये मोदी हरवले आहेत. ही जाहिरात नसल्याचं समोर आलं. या जागेवर "COURT A PUBLIC SPACE, COVERAGE PART OF FREEDOM OF SPEECH, SAYS SC" हे वृत्त होते.
निष्कर्ष:
व्हायरल झालेला फोटो आणि मूळ वृत्त पत्र पाहिल्यानंतर सदर जाहिरात खोटी असल्याचं निष्कर्ष आमच्या टीम ने काढला आहे.