Home > Fact Check > Fact Check: गांधी जयंती निमित्त दिलेल्या जाहिरातीत गांधींपेक्षा केजरीवाल यांचा फोटो मोठा? काय आहे सत्य

Fact Check: गांधी जयंती निमित्त दिलेल्या जाहिरातीत गांधींपेक्षा केजरीवाल यांचा फोटो मोठा? काय आहे सत्य

गांधी जयंती निमित्त दिलेल्या जाहिरातीत गांधींपेक्षा केजरीवाल यांचा फोटो मोठा? काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य

Fact Check: गांधी जयंती निमित्त दिलेल्या जाहिरातीत गांधींपेक्षा केजरीवाल यांचा फोटो मोठा? काय आहे सत्य
X

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त Dainik Jagran/New Delhi Edition मध्ये दिल्ली सरकारने एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधील एक कथित फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हायरल जाहिरातीमधील महात्मा गांधींचा फोटो लहान दाखवण्यात आला आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो मोठा असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

काय आहे दावा? CLAIM

२.५ लाख फॉलोअर्स असलेल्या "ट्रोल इंडियन पॉलिटिक्स" या फेसबुक पेज द्वारे सुद्धा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान "ट्रोल इंडियन पॉलिटिक्सने" असा दावा केला आहे की, "गांधी जयंती आहे की केजरीवाल जयंती हे माहित नाही".





दरम्यान सोशल मीडियावर अशाच प्रकारे अनेकांनी हा दावा केला आहे.

काय आहे सत्य? What is reality

तुम्हाला जो बदल जगामध्ये करायचा आहे. तो बदल अगोदर स्वत:मध्ये करा. महात्मा गांधी यांचा विचार या जाहिरातीमधून मांडण्यात आला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत व्हायरल केली जाणारी ही जाहिरात फेसबुक तसेच ट्विटर वरील अनेक युजर्सने याच दाव्यासह शेअर केली आहे.

या संदर्भात ही जाहिरात ज्या वृत्तपत्रात दिली आहे. ते वृत्तपत्र आम्ही तपासले असता, या व्हायरल फोटोची सत्यता समोर आली आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये डावीकडे 'दैनिक जागरण' असं लिहिलेलं दिसून येते. त्यामुळे, आम्ही 2 ऑक्टोबर रोजीचा दैनिक जागरण ई-पेपर तपासला. तेव्हा, आम्हाला वर्तमानपत्रात छापलेली मूळ जाहिरात सापडली.

त्यामुळे दिल्ली सरकार ने वृत्तपत्रात दिलेली जाहिरात ही फोटोशॉप करून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत शेअर करण्यात येत असल्याचं दिसून आलं आहे.




मात्र व्हायरल जाहिरातीमध्ये केजरीवाल यांचा वापरण्यात आलेला फोटो त्यांच्याच पक्षाने या अगोदर योजना आणि प्रकल्पांच्या जाहिरातीमध्ये अनेकदा वापरला होता.

या संदर्भात the Quint ने देखील फॅक्ट चेक केलं आहे. https://www.thequint.com/amp/story/news/webqoof/edited-photo-of-delhi-government-ad-on-mahatma-gandhi-jayanti-fact-check

एवढेच नव्हे तर, दिल्ली सरकारची ही जाहिरात आम्हाला 'द हिंदू' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया' सारख्या इंग्रजी वर्तमानपत्रांमध्येही सापडली. यातही मध्यभागी महात्मा गांधींचांच फोटो मोठा होता.




निष्कर्ष:

एकुणच, यावरून हे स्पष्ट आहे की, एडिट केलेला फोटो दिल्ली सरकारवर निशाना साधत गांधी जयंती निमित्त छापलेल्या जाहिराती मध्ये केजरीवाल यांचा फोटो महात्मा गांधींपेक्षा मोठा असल्याचा खोटा दावा करत शेअर केला जात आहे. हा फोटो फोटोशॉप आहे.

Updated : 3 Oct 2021 1:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top