Fact Check | MIM च्या वारीस पठाण यांची लॉकडाऊनमध्ये पोलिसांशी हुज्जत? हे आहे सत्य!
X
एमआयएम पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल आहे. ५५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पठाण हे पोलीस अधिकाऱ्यांऱ्यासोबत वाद घालत आहेत. या व्हिडीओला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.
व्हिडीओतील संवादावरून मशीद किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकर बंद करण्यावरून पोलीस अधिकारी देशमुख आणि वारीस पठाण यांच्यात वाद सुरू असल्याचं कळतंय. लॉकडाऊनदरम्यान मशिदीत गर्दी जमा होत आहे. त्याला पोलिसांनी अटकाव केला तर वारीस पठाण यांनी पोलिसांशी हुज्जत घातली असा सूर या सर्व व्हायरल पोस्ट्सचा आहे.
https://twitter.com/ArjunsinghWB/status/1255342691828805633?s=19
https://twitter.com/NaimishBhatt9/status/1255175337333448704?s=19
तथ्य पडताळणी
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा 'मुंबई लाईव्ह'या डिजिटल चॅनेलचा आहे. या व्हिडीओसंदर्भात या चॅनेलवर सर्च केल्यानंतर हा व्हिडीओ १८ नोव्हेंबर २०१६ रोजी अपलोड केल्याचं आढळलं. हा संपूर्ण व्हिडीओ १ मिनिट १४ सेकंदांचा आहे.
यासंदर्भात 'मुंबई लाईव्ह'ने ट्विट करत हा व्हिडीओ ४ वर्षांपूर्वीचा असून त्याचा लॉकडाऊनशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. नोव्हेंबर २०१६ मध्ये भायखळा भागातील एका मशिदीवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी पोलीस पोहीचले असता स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला होता. यावेळी तत्कालीन आमदार वारीस पठाण घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस आणि पठाण यांच्यात वाद झाला होता. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे.
https://twitter.com/MumbaiLiveNews/status/1255535806472732674?s=19
वारीस पठाण यांनी २८ एप्रिल रोजी ट्विट करत हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं होतं.
https://twitter.com/warispathan/status/1255152690302074881?s=19
https://twitter.com/warispathan/status/1255152696639680514?s=19
निष्कर्ष -
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा ४ वर्षांपूर्वीचा असून त्याचा लॉकडाऊनशी कसलाही संबंध नाही.