Home > Fact Check > पश्चिम बंगाल हिंसाचार: मारहाण झालेल्या महिलेचा फोटो नक्की कधीचा?

पश्चिम बंगाल हिंसाचार: मारहाण झालेल्या महिलेचा फोटो नक्की कधीचा?

पश्चिम बंगाल हिंसाचार: मारहाण झालेल्या महिलेचा फोटो नक्की कधीचा?
X

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये अनेक भागांमध्ये हिंसाचार झाल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार होत असल्याचं सोशल माध्यमांवरील पोस्टवरुन समजतंय. या हिंसाचारात आत्तापर्यंत १७ जणांना आपला जीव गमावला लागला आहे. त्यांपैकी ९ भाजप कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे ७ कार्यकर्ते आणि इंडियन सेक्युलर फ्रंटशी संबंधित 1 व्यक्तीचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या व्हिडीओने थैमान घातलं आहे. ट्विटरवर अनेक लोक पश्चिम बंगालच्या परिस्थिती भयानक झालीय. असं म्हणत एक फोटो शेअर करत आहेत.


याच दरम्यान एका महिलेचा रक्ताने माखलेला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्विटरवर अनेक लोकांनी शेअर केला आहे. ट्विटर वर हा फोटो शेअर करत अनेकांना हळहळ व्यक्त केली आहे. ईशा बजाज नावाच्या एका महिलेनेदेखील हा फोटो ट्विट केला आहे. त्या म्हणतात

"आबरू लूट गयीं बंगाल की क्या ये महिला नहीं, क्या बंगाल की बेटी नहीं, क्या बंगाली और महिला केवल ममता ही है । धिक्कार उन को जो महिला है और ममता का अब भी बेशर्मी से समर्थन कर रही है".

काय आहे त्यांचं ट्विट...

भाजपच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्य चंदना बाउरी @MlaChandana यांच्या parody अकाउंटवरुन सुद्धा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचं ट्विट केलं आहे.

@RKhandelwal_Bjp या ट्विटर हँडलने देखील हा फोटो ट्विट केला असून भारतीय जनता युवा मोर्चा झारखंड ने तो रिट्विट केला आहे. ट्विटरवर तसेच फेसबुकवर अनेकांनी हा फोटो शेयर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे सत्य -

गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्च मध्ये पाहिल्यानंतर हा फोटो 4 नोव्हेंबर 2020 च्या बांग्लादेशातील एका 'বাংলাদেশ হিন্দুদের পহ্ম প্রতিবাদ' नावाच्या फेसबुक पेजवर मिळाला. पेजवरील रिपोर्टनुसार बांगलादेशच्या हथजारी येथील अमन बाजारात राहणार्‍या एका हिंदू कुटुंबावर हल्ला झाला होता.


यापोस्टनुसार रूबेल, शाकिब, अरमान, उस्मान, मुर्शीद यांनी कुटुंबावर हल्ला केला होता. तर पीडित कुटुंबातील व्यक्तींची नावे अनुकूल मास्टर, रतन नाथ आणि मुक्ता देवी ही आहेत. तक्रार दाखल करूनही आरोपींना अटक न करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

या संदर्भांत बंगाली भाषेत की-वर्ड सर्च केल्यानंतर "चट्टोग्राम प्रतिदिन" ला ५ नोव्हेंबर २०२० ला एका रिपोर्टनुसार हथजारी येथील अमन बाजारात राहणार्‍या एका हिंदू कुटुंबावर हल्ला झाला होता. १ नोव्हेंबर 2020 ला रतन कुमार नाथ त्यांची सून पुतुल नाथ आणि भाची मुक्ता राणी यांच्यावर रूबेल, शाकिब, अरमान, उस्मान, मुर्शीद यांनी हल्ला केला होता. रिपोर्टनुसार रूबेल आणि त्याच्या जोडीदारांनी रतन कुमार नाथ यांच्या घराचं मोठं नुकसान केले होते. रतन नाथ यांच्या मुलाने सांगितल्यानुसार ५ नोव्हेंबर पर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार (FIR) नोंदवली नव्हती.

५ नोव्हेंबर २०२० च्या "eibela" च्या रिपोर्टनुसार फोटो मधील महिलेचं नाव अनामिक दास असल्याचं समोर आलंय. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादामुळे तिच्यावर हल्ला झाल्याचं रिपोर्टमधून समजलं. बांग्लादेशातील मीडिया आउटलेट "देश 1" नुसार सुद्धा या महिलेचं नाव अनामिक दास असल्याचं समोर आलं आहे.

फोटो नीट पाहिल्यास खुर्चीवर एक लोगो दिसत आहे. त्याचा शोध घेतला असता बांगलादेशातील एका फर्नीचरचा तो ब्रँड लोगो असल्याचं समोर आलं.


नोव्हेंबर २०२० मध्ये काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी देखील या घटनेचा फोटो शेअर केला होता आणि बांगलादेशातील चटगांव जिल्ह्यात एका हिंदू कुटुंबावर हल्ला झाल्याचं लिहिलं होतं.

निष्कर्ष

अल्ट न्युजने या संदर्भात वृत्त दिलं असून त्यांनी या फोटो संदर्भात रतननाथ यांच्याशी बातचीत केली. त्यांनी देखी हा फोटो त्यांच्या मुलीचा (अनामिक दास) हिचा असल्याचं म्हटलं आहे. जमीनीच्या वादामुळे तिच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. असं त्यांनी सांगितलं आहे.

अशाप्रकारे, बांगलादेशातील जमीन वादामुळे झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा फोटो पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी निकालानंतर झालेल्या हिंसाचाराशी जोडला जात असून तो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.

Updated : 6 May 2021 3:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top