Home > Fact Check > Fact Check: ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची 'महाध्यक्ष' म्हणून निवड?

Fact Check: ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची 'महाध्यक्ष' म्हणून निवड?

Fact Check: ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची महाध्यक्ष म्हणून निवड?
X

सध्या सोशल मीडियावर एक ग्राफिक्स चांगलंच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, काही लोक टाळ्या वाजवून नरेंद्र मोदींचं स्वागत करताना दिसत आहेत. या ग्राफिक्स मध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, "200 वर्ष आम्हाला गुलाम बनवून ठेवणाऱ्या ब्रिटनमध्ये काल 53 देशांच्या प्रमुखांमध्ये, मोदी हे महाध्यक्ष होते. हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने रुंदावली असेल."





हे ग्राफिक्स फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





दरम्यान, 2018 पासूनच हे ग्राफिक्स ट्विटरवर याच दाव्यासोबत शेअर केलं जात होतं.








काय आहे सत्य... (What is truth)

दरम्यान, अल्ट न्यूजने 2019 मध्येच या ग्राफिक्सबद्दल फॅक्ट चेक रिपोर्ट प्रकाशित केला होता. तसेच, हे ग्राफिक्स फोटोशॉप करून शेअर केलं जात असल्याचं देखील सिद्ध झालं आहे. या ग्राफिक्समध्ये, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटोदेखील जोडला गेला होता. आणि एडिट केलेला हा फोटो शेअर करत दावा केला जात होता की, इम्रान खान हे पंतप्रधान मोदींच्या आगमनादरम्यान, लपण्याचा प्रयत्न करत होते. ज्याचा मूळ फोटो आता व्हायरल होत आहे.

यासोबतच, 23 जानेवारी 2018 च्या डीएनएच्या रिपोर्टनुसार, "नरेंद्र मोदी दावोस येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेत सहभागी झाले होते. तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले टॉप ग्लोबल सीईओ या बैठकीला उपस्थित होते. हा फोटो त्याच बैठकीचा आहे.





भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही 23 जानेवारी 2018 रोजी हा फोटो ट्विट केला होता.

निष्कर्ष:

एकूणच, सोशल मीडियावर शेअर केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. कारण हा फोटो स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी झालेल्या बैठकीचा आहे ना की, ब्रिटनचा. या व्यतिरिक्त, असे कोणतेही मीडिया रिपोर्ट या संदर्भात माध्यमांवर आढळले नाहीत.

या संदर्भात Alt news ने Fact Check केले आहे. https://www.altnews.in/fact-check-pm-modi-became-chief-president-in-53-nations-meeting-in-britain/

Updated : 10 Oct 2021 12:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top