Fact Check: कॅब ड्रायव्हरला मारणारी 'ही' महिला नक्की कोण आहे? पोलिसांनी कोणाला केली अटक?
X
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही पोलीस एका मुलीला सोबत घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना, ही मुलगी लखनऊची प्रियदर्शनी यादव आहे. तिने एका एका कॅब ड्रायव्हरला मारहाण
https://www.aajtak.in/trending/photo/lucknow-cab-driver-beating-priyadarshani-yadav-police-inquiry-bikers-memes-tste-1306378-2021-08-09-१
केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ती चर्चेत आहे. तिने कॅब ड्रायव्हरला मारलं म्हणून तिला पोलिसांनी अटक केली आहे
.
इंडियन न्यूज नावाच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ प्रियदर्शनी यादव हिच्या अटकेचा असल्याचं सांगत शेअर केला आहे. चॅनलने एका बाजूला प्रियदर्शिनी यादव चा माध्यमांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ आणि दुसरीकडे मुलीला अटक केल्याचा व्हिडिओ दाखवला आहे.
फेसबुकवर अनेकांनी हा व्हिडिओ प्रियदर्शनी यादवचा असल्याचं सांगत शेअर केला आहे.
काय आहे सत्य...
सर्वप्रथम, या व्हिडिओमध्ये कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होताना दिसत नाही. कोणीही मास्क घातलेला नाही तसेच सामाजिक अंतर पाळलेले दिसत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मागील काही दिवसांमधील असल्याचं वाटत नाही. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचा चेहरा प्रियदर्शनी यादव पेक्षा वेगळा दिसत आहे. दरम्यान, आम्ही की वर्ड सर्च टूलचा वापर केला असता आम्हाला हा व्हिडिओ 30 मार्च 2017 चा असल्याचं आढळलं.
YouTube वर हा व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, "आनंदपालची साथिदार अनुराधाला पोलिसांनी अटक केली आहे." एवढंच नव्हे तर न्यूज 24 च्या जून 2016 च्या व्हिडीओ रिपोर्टमध्ये सुद्धा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचे फुटेज पाहायला मिळतात. तसेच राजस्थानची अनुराधा चौधरी हिला 'लेडी डॉन' म्हणून ओळखल जात असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान न्यायालयाने अनुराधाला 2 वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा केली होती.
दरम्यान नुकतंच दैनिक जागरण आणि TV9 भारतवर्ष यांनी अनुराधा चौधरीला पुन्हा अटक केल्याची बातमी दिली आहे. टीव्ही 9 भारतवर्षच्या रिपोर्टनुसार, अनुराधा चौधरीला नागौर जिल्ह्यातील न्यायालयाने 2016 मध्ये 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सोबतच 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
कोण आहे अनुराधा चौधरी?
अनुराधाचा जन्म राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात झाला आहे. अनुराधा ही गँगस्टर आनंदपाल सिंगची राईट हँड असून ती आनंदपाल याला बेकायदेशीर शस्त्रांच्या हेरगिरीमध्ये सहकार्य करत होती. अनुराधावर दरोडा, अपहरण, खंडणी मागणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रियदर्शिनी यादवचा व्हिडीओ चर्चेत... अटकेच्या प्रश्नावर प्रियदर्शिनी यादव हिने आज तकशी बोलतांना सांगितलं की, जर मला अटक झाली असती तर मी थेट टीव्हीवर दिसले असते का? तसेच सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याबाबत ती म्हणाली, जर हे सर्व असंच चालू राहिल तर मी सायबर सेलची मदत घेईल.
निष्कर्श:
एकंदरीत, राजस्थानच्या अनुराधा चौधरीच्या अटकेचा 5 वर्ष जुना व्हिडिओ लखनऊच्या प्रियदर्शनी यादव हिच्या अटकेचा सांगत शेअर केला जात आहे. alt news ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.