Fact Check: शेतकरी आंदोलनामधील व्यक्तीच्या खिशात मॅन फोर्स कंडोम?
X
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने २२ जुलैला नवीन वळण घेतलं आहे. नवी दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर शेतकरी आंदोलनकर्त्यांनी किसान संसदेची सुरुवात केली आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये पगडी घातलेल्या एका व्यक्तीच्या खिशात Man Force कंडोमचं पॅकेट असल्याचं दिसत आहे.
ट्विटर यूजर @Bhagwa_Sherni22 यांनी हा फोटो ट्विट करत लिहिलं आहे - खिशात आंदोलनासंबंधित दस्ताऐवज ठेवणारा शेतकरी. बनावट शेतकरी आंदोलन...
जेब में आंदोलन संबंधित दस्तावेज लेखक घूमता हुआ किसान।
— シ❤भगवा शेरनी❤シ🚩 (@Bhagwa_Sherni22) July 21, 2021
फर्जी किसान आंदोलन 🙄😠 pic.twitter.com/zGTGUyCYjm
ट्विटर यूजर 'हम लोग we the people' या हँडलने सुद्धा हाच दावा करत हा फोटो ट्विट केला आहे. मात्र, या अगोदर अनेकदा या ट्विटर यूजरने चुकीची माहिती शेअर केल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान शेतकरी आंदोलनावर निशाणा साधत अनेक फेसबूक आणि ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला आहे.
काय आहे सत्य?
रिव्हर्स इमेज टूल मध्ये पगडी घातेलेल्या व्यक्तीचा फोटो सर्च केला असता सदर फोटो ३ मे २०२१ ला कौमी मार्ग ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये हा फोटो पाहायला मिळाला. दरम्यान खऱ्या फोटोमध्ये व्यक्तीच्या खिशात कंडोम नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
'द ट्रिब्यून' च्या २०१८ च्या रिपोर्टमध्ये सुद्धा हा फोटो आहे. या फोटो मध्ये दिसणारे व्यक्ती हे 'सुच्चा सिंह लंगाह' आहेत. ते शिरोमणी अकाली दलाच्या सरकारमध्ये मंत्री होते. आपण व्हायरल होणार फोटो आणि मूळ फोटो यातील साम्य पाहू शकतो.
काय आहे सत्य?
एकूणच शिरोमणी अकाली दलाचे माजी मंत्री सुच्चा सिंह लंगाह यांचा फोटो एडिट करून खिशात कंडोम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत शेतकरी आंदोलनावर निशाणा साधला जात आहे. या अगोदरही अनेकदा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याच्या प्रयत्नात जुने आणि असंबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात असल्याचं दिसून आलं आहे.
व्हायरल फोटो