Fact Check: मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कुराण पठणाने झाली?
X
भाजप नेते हरिओम पांडे यांनी एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या साहित्य संमेलनातील हा फोटो असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पूर्वी साहित्य संमेलनाची सुरुवात सरस्वती वंदनेने व्हायची पण आता ती कुराणाच्या पठणाने होते. असा दावा हरिओम पांडे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड या फोटोत दिसत आहेत.
यह महाराष्ट्र सरकार ने नई प्रथा शुरू की है पहले साहित्य सम्मेलन की शुरुआत सरस्वती वंदना से होती थी अब साहित्य सम्मेलन की शुरुआत कुरान की आयतें पढ़कर होती हैं pic.twitter.com/icANoHuaAG
— Hariom Pandey (@hariompandeyMP) December 7, 2021
पश्चिम बंगालमधील शंकराचार्य गुरुकुलच्या अध्यक्ष अर्पिता चॅटर्जी यांनीही हा फोटो शेअर केला आहे. या ट्विटला 4500 लाईक्स मिळाले आहेत.
यह महाराष्ट्र सरकार ने नई प्रथा शुरू की है पहले साहित्य सम्मेलन की शुरुआत सरस्वती वंदना से होती थी अब साहित्य सम्मेलन की शुरुआत कुरान की आयतें पढ़कर होती हैंpic.twitter.com/K6agyDddq7
— Arpita Chatterjee (@arpitahindu)December 6, 2021
याशिवाय अनेकांनी हा फोटो शेअर करत महाराष्ट्र साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणातील आयतींच्या पठणातून झाली, असा दावा केला आहे. हा दावा करणाऱ्यांमध्ये RSS- शी संबंधीत महेश चौहान @humlogindia, @janardanspeaks, @archiepie11 यांचा समावेश आहे.
काय आहे सत्य?
फोटो पाहून गुगल वरन कीवर्ड सर्च केले असता, आम्हाला 'आपका प्रहार टाइम्स' या YouTube चॅनेलचा हा रिपोर्ट सापडला. 3 मिनिटे 20 सेकंदांनंतरच्या व्हि़डीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्या मुलाच्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. रिपोर्टनुसार, लग्नाच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून लाईव्ह केले होते. व्हायरल होत असलेल्या फोटो चं देखील या रिपोर्टमध्ये दिसत आहे.
सुप्रिया सुळे यांनी ४ डिसेंबरला या निकाहाचे फेसबुक लाईव्ह केले होते.
निष्कर्ष
एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नादरम्यानचा फोटो भाजप नेत्यांनी चुकीचा दावा करत शेअर केला आहे. हा फोटो साहित्य संमेलनाचे नसून लग्नाचे आहे.
या संदर्भात alt news ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/false-claim-maharashtra-literature-festival-starts-with-quran-supriya-sule/