Fact Check: मुंबईतील राजमाता जिजाऊ यांच्या नावाने असलेल्या उद्यानाचे नाव बदलले?
Fact Check: मुंबईतील राजमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे यांचे नाव बदलून हजरत हाजी पीर बाबा बाग करण्यात आलं आहे का?
X
सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये वीरमाता जिजाबाई यांच्या नावानं मुंबईत सुरु असलेल्या उद्यानाचं नाव बदलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल पोस्ट मध्ये वीरमाता जिजाबाई यांच्या नावाने सुरु असलेल्या उद्यानाचं नाव "हजरत हाजी पीर बाबा राणी बाग" असं केल्याचं सांगितलं जात आहे. हे उद्यान मुंबई मध्ये आहे. ट्विटर युजर केदार यांनी हा फोटो याच दाव्यासह ट्वीट केला आहे.
ट्वीटर वर बऱ्याच युजर्सने हा फोटो याच दाव्यासह ट्वीट केला आहे. फेसबुक वर ही हा फोटो व्हायरल आहे.
काय आहे सत्य...? What is reality?
दरम्यान, आम्ही 'वीर माता जिजाबाई उद्यान' विषयी पडताळणी केली असता, आम्हाला या उद्यानाचे नाव बदलण्याच्या संदर्भात कोणतीही बातमी मिळाली नाही. गुगल वर सुद्धा या उद्यानाचे नाव बदलल्या संदर्भात कोणतीही माहिती दिसून येत नाही.
दरम्यान या उद्यानासंदर्भात सर्च करत असतांना आम्हाला जैद नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओ मिळाला. हा व्हिडीओ 26 नोव्हेंबर 2021 चा आहे. या व्हिडीओ मध्ये 1 मिनिट 4 सेकंदावर उद्यानामध्ये एक साईन बोर्ड दिसून येतो. या बोर्डावर 'वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय' लिहीलं आहे.
अल्ट न्यूजने या दाव्याची पडताळणी करण्यासाठी वीर माता जिजाबाई उद्यान मुंबई च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, या संग्रहालयाचे डायरेक्टर डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी अल्टन्यूजला सांगितलं की, राजमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात असलेल्या एका अतिशय जुन्या दर्ग्याचे नाव हजरत हाजी पीर दर्गा आहे. या दर्ग्याच्या बाजूला एक साईन बोर्ड आहे. त्याच साइन बोर्डचा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. प्राणिसंग्रहालयाचे नाव बदलण्यात आलेले नाही.
निष्कर्ष:
एकूणच सोशल मीडियावर वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या परिसरात असलेल्या दर्गाबाहेरील साइन बोर्डचा फोटो सोशल मीडियावर खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
या संदर्भात Altnews ने फॅक्ट चेक केलं आहे.