Home > Fact Check > Fact Check: अफगाणिस्तान: पंजशीर पॅलेसमध्ये कृष्ण आणि पांडवांचा फोटो लावले आहेत का?

Fact Check: अफगाणिस्तान: पंजशीर पॅलेसमध्ये कृष्ण आणि पांडवांचा फोटो लावले आहेत का?

Fact Check: अफगाणिस्तान: पंजशीर पॅलेसमध्ये कृष्ण आणि पांडवांचा फोटो लावले आहेत का?
X

ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर, तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या प्रांताविरोधात पंजशीर व्हॅली हा शेवटचा प्रांत राहिला आहे. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तालिबानने दावा केला की, त्यांनी संपूर्ण पंजशीर व्हॅली ताब्यात घेतली आहे. 15 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार, पंजशीर प्रांताचं नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद याने नवीन तालिबान मंत्रिमंडळ नाकारत समांतर सरकार स्थापनेच्या घोषणा केली आहे. तर दुसरीकडे तालिबान सरकारने हे सरकार "बेकायदेशीर" असल्याची घोषणा केली आहे.





पंजशीर खोऱ्यातील या संघर्षानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. सोशल मीडिया यूजर्सने प्राचीन भारतातील प्रमुख संस्कृत महाकाव्यांपैकी महाभारतातील कृष्णा सोबत पांडवांचा एक फोटो शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या दाव्यानुसार, ही कलाकृती अफगाणिस्तानमधील पंजशीर पॅलेसमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, 'भारतीय धरोहर' या फेसबुक पेजनेही याच दाव्यासह हा फोटो पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टला 1 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.







या फोटोसह हाच दावा फेसबुक बरोबर ट्विटरवर देखील शेअर केला जात आहे.





काय आहे सत्य...

पंजशीर पॅलेस खरंच आहे का?

गुगल मॅप्स, विकिपीडिया आणि ट्रिप अॅडव्हायझरवर पंजशीर पॅलेसचा उल्लेख कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, आम्ही अफगाणिस्तानमधील दोन पत्रकारांशीही बोललो. मात्र, त्यांनी देखील सांगितलं की, तिथे अशी कोणतीही जागा नाही.

तो फोटो अफगाणिस्तानमध्ये आहे का?

दरम्यान, यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केलं असता ही पेंटिंग रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथील एसपीबी आर्ट गॅलरीच्या वेबसाइटवर असल्याचं पाहायला मिळालं.




या वेबसाइटनुसार, पेंटिंग रसिकानंदांनी बनवलं असून त्याचं शीर्षक 'कृष्ण आणि पांडव' असं आहे. कलाकाराच्या बायोग्राफीनुसार, त्याचा जन्म रशियाच्या कोमसोमोल्स्क-ऑन-अमूर शहरात झाला.



मात्र, व्हायरल पेंटिंग व्यतिरिक्त, वेबसाइटवर आणखीन 21 इतर पेंटिंगची यादी देखील आहे. मात्र, त्या सर्व पेंटिंग विकल्या गेल्या आहेत. ज्यात व्हायरल पेंटिंगचाही समावेश आहे.





ही पेंटिंग साकारणारे कलाकार फेसबुकवर देखील आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांचं नागरी आडनाव 'नोव्हिकोव्ह व्ही' असं आहे. मात्र, त्यांना मुख्यतः त्यांच्या भक्ती नावाने म्हणजे 'रसिकानंद दास' या नावाने ओळखलं जातं.

ते म्हणाले, "मी ही पेंटिंग १९९९ मध्ये, इस्कॉन टेम्पल कॉर्नास गार्डमध्ये स्वीडन बीबीटी आर्काइव्हजला पाठवली होती. ही कलाकृती श्रीमद भागवत (भागवत पुराण) च्या 7 व्या अध्यायानुसार बनविली गेली होती. मी ही पेंटिंग अफगाणिस्तानमधील कोणतंही ठिकाण लक्षात घेऊन बनवलेली नाही."

"मी ही पेंटिंग एकदाच बनवली आहे. परंतु इतर कोणत्याही कलाकाराच्या प्रती असल्यास, मी त्यावर काही बोलू इच्छित नाही." त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट देखील केली आहे.

निष्कर्श:

एकूणच, रशियन कलाकार रसिकानंद यांची 'कृष्ण आणि पांडव' ही पेंटिंग 'पंजशीर पॅलेस' मध्ये असल्याचा भ्रामक दावा करत शेअर केली जात आहे. ही पेंटिंग दोन दशकांहून अधिक जुनी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये, पंजशीर पॅलेसच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/no-this-krishna-and-pandavas-painting-is-not-in-panjshir-palace-afghanistan/

Updated : 26 Sept 2021 8:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top