Fact Check : पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीसमोर झुकवली मान?
गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहे. बागेश्वरकडे दैवी शक्ती असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र बागेश्वर धामला अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी खुलं आव्हान दिले होते. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धामला भेट देत धीरेंद्र शास्रीसमोर मान झुकवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पण खरंच पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर धामला भेट देत धीरेंद्र शास्रीसमोर मान झुकवली होती का? जाणून घ्या व्हायरल दाव्यामागचं सत्य मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्या फॅक्ट चेकमधून...
X
गेल्या काही दिवसांपुर्वी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यातच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याचा दावा करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच बागेश्वर धाम बाला जी कृपा करें नावाच्या फेसबुक पेजवर पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर धामला भेट दिल्याचा दावा केला. बागेश्वर धाम पहुँचे नरेंद्र मोदी, अपनी अर्जी लगवाने #बागेश्वर #बागेश्वर धाम पहुँचे नरेंद्र मोदी, | बागेश्वर धाम बाला जी कृपा करें | बागेश्वर धाम बाला जी कृपा करें · Original audio
28 views, 1 likes, 0 comments, 25 shares, Facebook Reels from बागेश्वर धाम बाला जी कृपा करें: बागेश्वर धाम पहुँचे नरेंद्र मोदी, अपनी अर्जी लगवाने #बागेश्वर #बागेश्वर धाम पहुँचे नरेंद्र मोदी,....
knowldge TV GK यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धाम येथे पोहचले आहेत.
युट्यूबवर Bikash Burnawal नावाच्या चॅनलवर पंतप्रधान मोदी हे बागेश्वर धामला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. (PM Visit to bageshwar Dham)
अनोखी दुनिया नावाच्या युट्यूब चॅनल्सवरही बागेश्वर धाम बाबाच्या दरबारात पंतप्रधान मोदी गेल्याचा दावा केला आहे.
पडताळणी (Fact Check)
बागेश्वर धाम आश्रमात पंतप्रधान मोदी गेल्याचे आणि धीरेंद्र शास्त्रीसमोर नतमस्तक झाल्याचा दावा करण्यात आलेल्या फोटोची रिव्हर्स इमेजच्या (Reverse image) माध्यमातून पडताळणी केली. यावेळी बागेश्वर धामच्या समोर पंतप्रधान मोदींनी हात जोडल्याचे अनेक फोटो पहायला मिळाले. यानंतर मॅक्स महाराष्ट्रच्या फॅक्ट चेक टीमला एक फोटो मिळाला. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये गुजरातमधील मोधेश्वरी माता (Modheshwari Mata Gujrat) मंदिरात पुजा केली होती. त्यावेळचा असल्याचे समोर आले.
ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोधेश्वरी मातेच्या मंदिरात निळ्या रंगाचे बंडी जॅकेट आणि भगव्या रंगाची शाल पांघरलेले दिसत आहेत.
यासंदर्भात काही की-वर्ड सर्च केल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रला संसद टीव्हीचा एक व्हिडीओ मिळाला. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी मोधेश्वरी मातेचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहेत.
यानंतर व्हायरल होत असलेल्या दाव्यावर बागेश्वर धाम धीरेंद्र शास्रीने व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासमोर नतमस्तक झाले नसल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारे व्हायरल होत असलेली माहिती चुकीची असून यावर विश्वास ठेऊ नका, असं मत या व्हिडीओत व्यक्त केले आहे. तसेच ज्यांनी ही चुकीची माहिती पसरवली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे बागेश्वर धामने म्हटले आहे.
काय आहे सत्य? (What is Reality)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेतल्याचा दावा भ्रामक असल्याचे स्पष्ट होत आहे.