Home > Fact Check > देशातील दुसरं सर्वात मोठे कोव्हिड सेंटर RSS चे आहे का?

देशातील दुसरं सर्वात मोठे कोव्हिड सेंटर RSS चे आहे का?

देशातील दुसरं सर्वात मोठे कोव्हिड सेंटर RSS चे आहे का?
X

भारतातील सर्वात मोठे दुसरे कोव्हीड सेंटर हे RSS ने बनवल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदोरमध्ये 6 हजार बेड्सचे कोव्हिड केअर सेंटर आणि 45 ऑक्सिजन प्लांट्स ची निर्मिती केल्याचा दावा केला जात आहे.

हर्षवर्धन मुप्पावारापू यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे, ज्याद्वारे याची माहिती मिळते.

काय म्हटलंय हर्षवर्धन मुप्पावारापू यांनी ट्विट मध्ये -

भारतातील सर्वात मोठे दुसरे COVID-19 सेंटर.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 6 हजार बेड्सचे कोव्हिड केअर सेंटर आणि 45 एकरात 4 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली आहे.

त्याबद्दल त्यांचे कौतुक...

दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष रंजन तिवारी यांनी सुद्धा हा दावा केला आहे.

@MeghUpdates या ट्विटर हँडेलने देखील हा दावा केला असून त्याला 2 हजार 900 पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. या व्यतिरिक्त @EconomistSanghi, @doctorrichabjp, @KaaliaSholay या ट्विटर हँडल्सने देखील हा दावा करत ट्विट केलं आहे.

काय आहे सत्यता?

नक्की हे प्रकरण काय आहे? देशातील दुसरे सर्वात मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे का? RSS ने हे कोव्हिड केयर सेंटर उभारलेलं आहे का? 45 एकरात 4 ऑक्सिजन प्लांट्स ची स्थापना केली आहे का?

ANI च्या 22 एप्रिलच्या 2021 च्या रिपोर्टनुसार मध्य प्रदेशात राज्यातील सर्वात मोठे कोव्हीड केयर सेंटर उभारण्यात आलेलं आहे. सध्या या सेंटरमध्ये 600 बेड्स आहेत. नंतर ते 6 हजार पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. इंदौर मधील राधास्वामी सत्संग भवन मैदानाचे "मा अहिल्या" कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

बातमीमध्ये मंत्री तुलसी सिलावट यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वतीने राधास्वामी सत्संग व्यास यांचे मी आभार मानते. पहिल्या टप्प्यात ६०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा समाविष्ट होतील.

इंदोरमध्ये हे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यासाठी अनेक उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी देणगी दिली आहे, मी त्यांचे आभार मानते.

माध्यमांच्या बातम्यामध्ये काय?

हीत बातमी न्यूज 18, एनडीटीव्ही आणि अमर उजाला यांनीही या संदर्भात बातमी दिली आहे. यापैकी कोणीही हे कोव्हीड केअर सेंटर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारल्याचं म्हटलेलं नाही.

न्यूज 18 ने दिलेल्या बातमी नुसार -

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी उपस्थित असतील, रुग्णांची काळजी घेतील. रुग्णांच्या सुरक्षा व देखरेखीसाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत."

अमर उजालाने दिलेल्या बातमीनुसार -

आपल्या अनोख्या सेवा कार्यामुळे देशात चर्चित असणारे "राधास्वामी सत्संग व्यास" ने मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये दुसरे सर्वात मोठे कोविड सेंटर तयार केले आहे.

अल्ट न्युजने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी मध्य प्रदेशातील कोव्हीड एडवाइज़री कमिटी चे सदस्य डॉ. निशांत खरे यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले

सोशल मीडियावर केले जाणारे दावे चुकीचे आहेत.

ते "माँ अहिल्या कोव्हीड केअर सेंटर राधास्वामी सत्संग व्यास परिसरामध्ये तयार करण्यात आले आहे. यात ६००० बेड्स असणार आहेत. आणि पहिल्या टप्प्यात ६०० बेड्ससोबत सुरुवात केली गेली आहे. पुढे प्रत्येकी ६०० बेड्स वाढत जातील, 29 एप्रिलला दुसर्‍या टप्प्यात आणखी 600 बेड्स वाढवले जातील. प्रत्येकी ५ दिवसांच्या अंतराने ही प्रक्रिया सुरु राहील.

जिल्हा प्रशासनाकडे याची मालकी राहिल. यामध्ये मध्य प्रदेश प्रशासन वैद्यकीय सुविधा व कर्मचार्‍यांची व्यवस्था करत आहे. राधास्वामी सत्संग व्यास यांचं खूप मोठं योगदान यात आहे. अन्न, पाणी, दूध, चहा, काढा या सर्व बाबी राधास्वामी सत्संग व्यासद्वारे पुरवल्या जात आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात सामाजिक पाठिंबा मिळाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या पाठिंब्यामुळे सरकारचं योगदान फक्त २० टक्क्यांवर आलं आहे. स्थानिक लोकांच्या सहभागाने बेड्स, टेंट हाऊस, कूलिंग लॉगची व्यवस्था तसेच रोजच्या वापरातले सामान मिळत आहे. जिल्हा प्रशासन आणि समाज यांच्या सहकार्याने ही सर्व कामे अतिशय सुंदरपणे केली जात आहेत.

निष्कर्ष -

सोशल मीडियावर "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे कोव्हीड सेंटर उभारले आहे" हा केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. हे सेंटर सरकार आणि सामाजिक सहकार्याने बांधले गेले आहे. हे उभारण्यासाठी अनेक असोसिएशन तसेच रिअल इस्टेट असोसिएशननेही पैसे दिले आहेत. तसेच यामध्ये सगळ्यात मोठे योगदान हे राधास्वामी सत्संग व्यास यांचे आहे.

RSS आणि सेवा भारती यांनी तेथे फक्त आपले स्वयंसेवक दिलेले आहेत. दररोज ७५ स्वयंसेवक सेवेसाठी येतात, हे लोक बाहेरील सुरक्षिततेचे काम हाताळतात तसेच स्वयंपाक करणारे राधास्वामी सत्संगच्या सेवकांना मदत करतात. एकुणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे सेंटर उभारले नसून त्यांनी फक्त आपले स्वयंसेवक सेवेसाठी दिलेले आहेत.

हे फोटो नक्की कशाचे आहेत ?

खोट्या दाव्यासह व्हायरल केल्या जाणाऱ्या दोन फोटोपैकी पहिला फोटो इंदोरच्या खंडवा रोड येथे असलेल्या राधास्वामी कॅम्पसचा आहे. 18 एप्रिल 2021 रोजी इंदोर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तो ट्विट करण्यात आला होता.

दुसरा फोटो हा कतारमधील फुटबॉल मैदानाचा आहे.

Alt news ने याबाबात वृत्त दिलं आहे

https://www.altnews.in/hindi/rss-hasnt-build-second-largest-covid19-care-center-in-indore-false-claim-viral/

Updated : 3 May 2021 8:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top