Home > Fact Check > Fact Check : उन्हाळ्यात गाडीत जास्त पेट्रोल भरल्याने टाकी फुटू शकते का?

Fact Check : उन्हाळ्यात गाडीत जास्त पेट्रोल भरल्याने टाकी फुटू शकते का?

उन्हाळ्यात गाडीत जास्तीत जास्त पेट्रोल भरणं धोक्याचं आहे का? इंडियन ऑईलच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो खरा आहे का? चला तर जाणून घेऊयात Fact Check भरत मोहळकर यांच्यासोबत....

Fact Check : उन्हाळ्यात गाडीत जास्त पेट्रोल भरल्याने टाकी फुटू शकते का?
X

मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने या फोटोशी संबंधित की-वर्डस् शोधले. त्यानंतर अशाच प्रकारे दावा करणारे हिंदी आणि इंग्रजीतील फोटो समोर आले.






त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने ट्वीटरवर यासंदर्भात माहिती शोधली. त्यात म्हटले आहे की, आगामी दिवसात तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे तुमच्या गाडीत जास्तीत जास्त पेट्रोल भरू नका. नाहीतर तुमच्या गाडीच्या टाकीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात अशाच पध्दतीने पेट्रोलची टाकी फुल भरल्याने पाच अपघात झाले आहेत. त्यामुळे टाकी भरताना आधी त्यातील हवा बाहेर जाऊ द्या. हा मेसेज तुमच्या जास्तीत जास्त गृपमध्ये पाठवा, असं या फोटोत म्हटले आहे.


यानंतर मॅक्स महाराष्ट्रने इंडियन ऑईलच्या ट्वीटरवर अशा प्रकारे काही माहिती आहे का पाहिली. त्यामध्ये इंडियन ऑईलने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले पहायला मिळाले. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.



निष्कर्ष

सोशल मीडियावर इंडियन ऑईलच्या नावाने पसरवला जात असलेला फोटो खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

Updated : 23 April 2023 9:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top