Fact Check अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या पायात खरंच बेड्या घातल्या आहेत का ?
X
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही सगळी परिस्तिथी भयावह असून लोक देश सोडून पळून जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तीन बुरखा घातलेल्या महिलांपुढे एक पुरुष चालतांना दिसत आहे. फोटोमधील पुरुषाच्या हातात साखळी आहे. त्या साखळीच्या बेड्या त्या तीन महिलांच्या पायात बांधल्या आहेत. दरम्यान, हा फोटो आत्ताचा असल्याचं म्हणत शेअर केला जात आहे.
TV9 भारतवर्षचे अँकर शुभंकर मिश्रा यांनी या फोटोसह आणखी एक फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ""हे कसं सुरू झालंच्या विरुद्ध कसं चाललं आहे. 1960 - 70 च्या दशकात अफगाणिस्तान हे युरोपियन संस्कृती आणि आशियाई नीतीमत्तेचे परिपूर्ण मिश्रण होते."
How it started Vs How it's going
– During the 1960s -70s #Afghanistan was a perfect blend of European culture and Asian ethics. #AfghanWomen #KabulHasFallen pic.twitter.com/braDLwlaLa
— शुभांकर मिश्रा (@shubhankrmishra) August 16, २०२१
दरम्यान, काही तासांनंतर, शुभंकर मिश्रा यांनी या दोनही फोटोंचं एक कोलाज ट्वीट केलं, ज्यात वरच्या फोटोवर 1960 आणि खालच्या फोटोवर 2021 असं लिहिलं आहे.
आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने हे फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, "देव महिला आणि मुलांचं रक्षण करो, कारण संयुक्त राष्ट्रांसारखी संस्था अपयशी ठरली आहे." ट्विटरवर हा फोटो प्रचंड व्हायरल आहे.
फेसबुकवरही अनेकजण हा फोटो शेअर करत आहेत.
काय आहे सत्य...?
व्हायरल होणारा फोटो नीट पहिला तर फोटोमध्ये दिसणारी साखळी आणि जमिनीवर पडणारी साऊली यामध्ये गडबड दिसून येते. फोटोमध्ये असणारा पुरुष आणि त्याच्यामागे असणारी महिला यांच्यामधील साखळीची साऊली स्पष्ट दिसून येते. मात्र, मागील दोन महिलांच्या पायातील बेड्यांची साऊली दिसत नाही.
की - वर्ड रिव्हर्स इमेज सर्च केले असता, आम्हाला एबीपी न्यूजची बंगाली आवृत्ती एबीपी आनंदाचा 2017 चा एक रिपोर्ट सापडला. या रेपोर्टमधील फोटो हा अगदी व्हायरल होणाऱ्या फोटोप्रमाणे होता. मात्र, त्यामध्ये कुठेही साखळी किंवा बेड्या दिसत नव्हत्या.
2017 च्या मॉडर्न डिप्लोमसीच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हा फोटो समाविष्ट करण्यात आला होता. पण त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या बेड्या दिसत नव्हत्या. आणखी शोध घेतला असता, आम्हाला 2011 आणि 2012 मधील काही ब्लॉग सापडले ज्यात त्याचा मूळ फोटो समाविष्ट करण्यात आला होता.
दरम्यान, इंटरनेट आर्काइव्ह लायब्ररीमध्ये सर्च केले असता एका ब्लॉगची आर्काइव्ह लिंक सापडली. ज्यामध्ये २०११ पासूनच मूळ फोटो शेअर होत असल्याचं समजलं. म्हणजेच हा फोटो किमान 10 वर्ष जुना आहे.
यामध्ये अमेरिकन पत्रकार बार्बरा वॉल्थर्स एका अफगाणी महिलेशी बोलत असल्याचा उल्लेख होता. ज्यामध्ये बार्बरा यांनी अफगाणिस्तानातील महिलेला तिच्या पतीच्या मागे चालण्याचे कारण विचारले. उत्तर देतांना अफगाण महिला म्हणाली, "लँड माईन्स".
2017 मध्ये अभिजित अय्यर मित्रा यांनी व्हॉट्सअॅपचा हवाला देत ट्विटरवर हीच गोष्ट शेअर केली होती. म्हणजेच. दरम्यान, अमेरिकी फॅक्ट-चेक एजन्सी स्नॉप्सने 2014 मध्ये बार्बरा वेल्थर्सच्या रिपोर्टची चौकशी केली असता त्यांना आढळून आलं की, हे फक्त एक व्यंग आहे जे 2001 पासून इंटरनेटवर वेगवेगळा दावा करत शेअर केले जात आहे.
निष्कर्ष
एकूणच १० वर्ष जुना फोटो अलीकडचा सांगत शेअर केला जात आहे. या संदर्भात अल्ट न्यूजने फॅक्ट चेक केलं आहे.