Fact Check: पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर व्हायरल झालेला फोटो नक्की कधीचा?
X
पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर बंगालमधील अनेक ठिकाणांहून हिंसाचाराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार या हिंसाचारात आत्तापर्यंत 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 6 भाजप कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे 4 कार्यकर्ते आणि इंडियन सेक्युलर फ्रंटशी संबंधित 1 व्यक्तीचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. सध्या सोशल मीडियावर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या व्हिडीओने थैमान घातलं आहे.
ट्विटरवर अनेक लोक पश्चिम बंगालच्या परिस्थिती भयानक झालीय. असं म्हणत एक फोटो शेअर करत आहेत. @Priyankkashyap2 या ट्विटर हँडलने देखील हे ट्विट केलं आहे, या ट्विटला ६६ रिट्विट आहेत. त्यांच्या ट्विट मध्ये त्या म्हणतात #BengalBurning पश्चिम बंगालच्या हिंदूंची परिस्थिती भयानक झाली आहे... आणि आत्ताच ही परिस्थिती आहे तर पुढील ५ वर्षात काय काय होईल?
या घटनेनंतर इमाम यांनी समाजाला विनंती करत हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं. असं न झाल्यास मी शहर सोडून निघून जाईल, माझा मुलगा मी गमावला पण अजून कोणी आपल मुलं गमावू नका असं त्यांनी म्हटलं आहे. २०१८ च्या इंडिअन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हा फोटो पाहायला मिळतो. निष्कर्ष कायं? २०१८ साली झालेल्या जातीय हिंसाचारा दरम्यानचा फोटो आत्ताचा सांगून शेअर केला जात आहे. सध्या सुरु असलेल्या हिंसाचाराबरोबर हा जुना फोटो ही अनेक नेटकरी शेअर करत असल्याने जुना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.