Home > Fact Check > Fact Check : व्हायरल होत असलेला नंदीचा फोटो ज्ञानवापी मशिदीसमोरचा आहे का?

Fact Check : व्हायरल होत असलेला नंदीचा फोटो ज्ञानवापी मशिदीसमोरचा आहे का?

सोशल मीडियावर नंदीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो फोटो ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हा दावा खरा आहे का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Fact Check : व्हायरल होत असलेला नंदीचा फोटो ज्ञानवापी मशिदीसमोरचा आहे का?
X

न्यायालयात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. त्यातच वाराणसी न्यायालयाने मशिदीच्या आवाराचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. तर तो वुजूखान्याचा फवारा असल्याचे मुस्लिम पक्षकारांचे मत आहे. दरम्यान सोशल मीडियावर नंदीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नंदीचे तोंड कायम शिवलिंगाच्या दिशेने असते. त्यामुळे यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्ञानवापी मशिदीतील नंदीचे तोंड हे मशिदीकडे आहे. तसेच या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, मुस्लिम ज्या दरवाजात नमाज अदा करतात. त्या दरवाजाकडे नंदीचे तोंड आहे.

नंदी आपल्या मालकाची वाट पाहत असतो. त्यामुळे आमचे प्रभु तिथे आहेत आणि आमची वाट पाहत आहेत, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

फेसबुक पेज नमो दोबारा, हिंदूत्व यासह फेसबुक गृप वी सपोर्ट अमित शाह, ट्वीटर वापरकर्ते द सनातन उदय, तुलसी आहुजा या हँडलवर ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटर आणि फेसबुक खात्यांसह अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.




या नंदीचा फोटो शेअर करत हा दावा पहिल्यांदाच करण्यात आला नाही. तर यापुर्वीही अशाच प्रकारे 2019, 2020, 2021 मध्ये दावा करण्यात आला होता.




पडताळणी –

अल्ट न्यूजने व्हायरल होत असलेल्या इमेजला शटर स्टॉकच्या रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले. त्यावेळी अशाच प्रकारचा आणखी एक फोटो मिळाला. त्या फोटोच्या वेबसाईटमध्ये हा फोटो सातारा जिल्ह्यातील वाईच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणातलच्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.




या फोटोच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीचा आधार घेत अल्ट न्यूजने यासंदर्भात युट्यूबवर काही कि-वर्ड्स सर्च केले. त्यात साताऱ्यातील वाईच्या काशी विश्वेश्वर मंदिराचा एक व्हिडीओ मिळाला. या व्हिडीओमध्ये 52 व्या सेकंदाला एक नंदीची मुर्ती दिसत आहे. ती मुर्ती हुबेहुब व्हायरल होत असलेल्या ग्राफिक्ससारखी दिसत आहे.

निष्कर्ष-

वरील माहितीवरून असे दिसून येत आहे की, व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसणारा नंदी सातारा जिल्ह्यातील वाईच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणातील आहे. मात्र हा फोटो ज्ञानवापी मशिदीशी जोडून शेअर केला जात आहे. परंतू वास्तवात या फोटोचा आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीचा काडीमात्र संबंध नाही.

वरील विषयासंदर्भातील फॅक्ट चेक अल्ट न्यूजने केले आहे.

Updated : 20 May 2022 9:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top