Fact Check : मोदींच्या दौऱ्यावेळी खलिस्तान समर्थकांनी रॅली काढली होती का?
X
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याने मोदींचा पंजाब दौरा गाजला. या दौऱ्याच्या वेळी खलिस्तान समर्थक खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केला जात आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर असताना घडली असल्याचा दावाही केला जात आहे. पण अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्टचेकमध्ये या व्हिडिओचे सत्य समोर आले आहे.
5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. तेव्हा खराब हवामानामुळे भटिंडा विमानतळावरून फिरोजपुरच्या दिशेने रस्तामार्गे जात असताना निदर्शकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडले होते. त्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने ही घटना पंतप्रधानाच्या सुरक्षेतील चूक आहे, असे म्हटले. तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ या घटनेशी जोडून शेअर केला जात आहे.
Why Channi Led Punjab Congress Government Not Arrested Those Who Raised Slogans Of Khalistan Zindabad Yesterday ?
— Gaurav Mishra 🇮🇳 (@IAmGMishra) January 6, २०२२
Shame On Congress!#PresidentRuleInPunjab pic.twitter.com/0wZdfD3df2हा व्हिडीओ ट्वीटरसोबतच फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पडताळणी-
27 डिसेंबर 2021 रोजी एका ट्वीटर वापरकर्त्याने हा व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यामुळे हा व्हिडीओ 5 जानेवारी 2022 रोजी घडला नसल्याचे सिध्द होत आहे. एका ट्वीटर वापरकर्त्याने सांगितले की हा व्हिडीओ 26 डिसेंबर 2021 रोजी पंजाबच्या सरहिंदमध्ये छोटे साहिबजादे यांच्या आठवणीत काढलेल्या दुचाकी रॅलीतील आहे. छोटे साहिबजादे यांना गुरू गोविंद सिंह यांचा मुलगा मानतात. तसेच 26 डिसेंबर 1704 या दिवशी छोटे साहिबजादे शहीद झाले होते. त्यांना शक सरहिंद नावाने ओळखले जाते. तर दरवर्षी 26 डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन पंजाबमधील फतेहगढ साहिब येथे साजरा केला जातो.
27 डिसेंबर 2021 रोजी हा पूर्ण व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला.
हा व्हिडीओ फेसबुकवरही पोस्ट करण्यात आला आहे.
निष्कर्ष- 26 डिसेंबर 2021 रोजी छोटे साहिबजादे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त काढलेल्या दुचाकी रॅलीत देण्यात आलेल्या 'खलिस्तान जिंदाबाद' आणि 'राज करेगा खालसा' या घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत निर्माण झालेल्या त्रुटीच्या वेळी म्हणजे 5 जानेवारीला दिल्या गेल्या असल्याचा खोटा आणि खोडसाळ दावा करून शेअर केला जात आहे.