Fact Check : 1963 मध्ये 'द ओमायक्रॉन व्हेरियंट' नावाचा चित्रपट आला होता का?
X
कोरोनाच्या Omicron विषाणूने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने SARS-CoV-2 व्हेरियंट B.1.1.1.529 या विषाणूबद्दल गंभीर इशारा दिला आहे. या विषाणूला Omicron असे नाव देण्यात आले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर 1963 साली प्रदर्शित झालेल्या 'द ओमायक्रॉन व्हेरियंट' नावाच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले जात आहे. एवढेच नाही तर अनेक दिग्गज लोकांनी देखील हे पोस्टर शेअर केले आहे. पण 1963 साली ओमिक्रॉन विषाणूवर चित्रपट आला होता का? वाचा या व्हायरल दाव्यातील तथ्य.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत गंभीर इशारा दिला आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत या विषाणूचा पहिला रूग्ण आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला ओमायक्रॉन असे नाव दिले. मात्र 2 डिसेंबर रोजी काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी 1963 साली प्रदर्शित झालेल्या 'द ओमायक्रॉन व्हेरियंट' या चित्रपटाचे कथीत पोस्टर शेअर करून ओमायक्रॉनवर प्रश्न उपस्थित केला. तर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यानेही ही पोस्ट शेअर केली आहे.
या कथित चित्रपटाचे पोस्टर अभिनेता गौतम रोडे यानेही शेअर केले आहे.
या चित्रपटाचे आणखी एक कथीत पोस्टर अमेरिकेचा क्रिस्टोफर मिलर याने शेअर केले आहे. तर ते ट्वीट 1 हजार पेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट केले आहे.
फोटोची पडताळणी
अल्ट न्यूजने या दाव्याची पडताळणी केली असता 'द ओमायक्रॉन व्हेरियंट' नावाचा कोणताही चित्रपट अस्तित्वात नाही. मात्र 1963 मध्ये 'ओमिक्रॉन' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतू IMDb वर या चित्रपटाची कथेची माहिती सांगितली आहे. त्यात एक एलियन पृथ्वीच्या बाबतीत जास्तीची माहिती मिळवून पृथ्वीवर कब्जा करण्यासाठी पृथ्वीवरील माणसाच्या शरीरावर कब्जा करतो.
पहिला फोटो
राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेला फोटो व्हर्जिन मीडिया आयर्लंडचे लेखक बिकी चीटल यांनी बनवला आहे. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहीले आहे की, 'द ओमायक्रॉन व्हेरियंट' फ्रेजचा वापर करून सायन्स फिक्शन या प्रकारातील 70 च्या दशकातील काही चित्रपटांचे पोस्टर फोटोशॉप केले होते.
बेकी चीटल यांनी बनवलेले पोस्टर फेज 4 या चित्रपटावर आधारित आहे. तर IMDb वर चित्रपटाच्या कथेबाबत म्हटले आहे की, वाळवंटातील मुंग्यांमध्ये अचानक शहाणपण येते आणि मुंग्या तिथे राहणाऱ्यांच्या विरोधात युध्द पुकारतात. तेव्हा दोन शास्रज्ञ आणि एक मुलगी त्या मुंग्यांच्या तावडीतून वाचून त्यांना कसे नष्ट करतात, याची कथा सांगितली आहे. तर खाली दिलेल्या पोस्टरमध्ये हात आणि कलाकारांच्या नावांमध्ये समानता दिसत आहे.
दुसरा फोटो क्रिस्टोफर मिलर याने शेअर केलेली पोस्टही पहिल्या पोस्ट प्रमाणे 1966 साली आलेल्या 'सायबर्ग 2087' वर आधारित आहे.
निष्कर्ष
अल्ट न्यूजने घेतलेल्या दाव्याच्या पडताणीनुसार सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून शेअर केले जात असलेले फोटो चुकीच्या दाव्यासह शेअऱ केले जात आहेत. तर हे फोटो फोटोशॉप केलेले आहेत. मात्र ओमायक्रॉन विषयी भविष्यवाणी करणारा द ओमिक्रॉन व्हेरियंट असा कोणताही चित्रपट आला नव्हता. तसेच सोशल मीडियावर केलेले दावे साफ खोटे आहेत.
या संदर्भात alt news ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/fictional-movie-poster-the-omicron-variant-believed-to-be-true/