Home > Fact Check > Fact Check : भारतात कॉम्प्यूटर १४०० वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात होते?

Fact Check : भारतात कॉम्प्यूटर १४०० वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात होते?

Fact Check : भारतात कॉम्प्यूटर १४०० वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात होते?
X

एका प्राचीन मूर्तीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. या फोटोतून दावा करण्यात आला आहे की, भारतात १४०० वर्षांपुर्वी पल्लव नावाचा राजा असतांना कॉम्प्यूटर बनवण्यात आला होता. ही मूर्ती वीजेच्या तारेने जोडलेल्या कॉम्प्यूटर समोर बसलेल्या एका व्यक्तीची आहे. नेटिझन्सनी हा फोटो शेयर करत भारताच्या तत्कालीन औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीवर आश्चर्य व्यक्त केलंय. विशेष म्हणजे तेव्हा आधुनिक वीजेचा अविष्कारही झाला नव्हता. (आर्काइव)


हा दावा ऑगस्ट २०२२ पासून केला जातोय (आर्काइव)

हा फोटो फेसबूक वरही व्हायरल होतोय





ऑल्ट न्यूज च्या व्हाट्सएप हेल्पलाईन नंबर (76000 11160) आणि त्यांच्या एप वर या दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी अनेकांनी रिक्वेस्ट केली होती.








Fact Check :

ऑल्ट न्यूज ने व्हायरल होत असलेल्या या फोटोला गुगल रिवर्स इमेज वर सर्च केलं. त्यावर मैक्सिकन आर्टिस्ट राउल क्रूज च्या आर्टस्टेशन ची प्रोफाईल मिळाली. ज्यात व्हायरल होत असलेला फोटो हा ओरिजनल आर्टवर्क्स पैकी एका यादीतील आहे. मेमरी ऑफ द फ्यूचर नावाच्या या कलाकृतीला चार वर्षांपूर्वीचं पोस्ट करण्यात आलं होतं.

कलाकार राउल क्रूज ला आर्टस्टेशन वरील त्यांच्या अबाऊट पेज वर एक स्वतंत्र चित्रकार/चांगले कलाकार असे संबोधण्यात आले आहे. या पेज नुसार, राउल क्रूज यांचं काम Fantastic Art या शैलीअंतर्गत झालं आहे. मेसो अमेरिकन कलेसोबतच संयुक्त भविष्यवादी सौंदर्यशास्त्र आणि वैज्ञानिक गोष्टींनी भुतकळा आणि वर्तमानाला भविष्यासोबत जाऊन त्यांच्या कामाला प्रभावित केलं आहे. व्हायरल होणा-या या कलाकृतीत ही विशेषतः स्पष्टपणे दिसून येते.





ऑल्ट न्यूजला ही कलाकृती राउल क्रूज च्या आर्टस्टेशन इंस्टाग्राम पेजवरही आढळू आली. जी सप्टेंबर २०१८ मध्ये पोस्ट करण्यात आली होती. त्याखाली कॅप्शन होतं, “ मेमोरिया डेल फ्यूचरो, ऐक्रेलिक ऑन फाइबरग्लास, २०१५.”





याशिवाय, ऑल्ट न्यूज ला आढळले की, या कलाकृतीचा उपयोग ‘कॉसमॉस लैटिनोस: एन एंथोलॉजी ऑफ़ साइंस फ़िक्शन फ्रॉम लैटिन अमेरिका एंड स्पेन’ नावाच्या पुस्तकाच्या कव्हर आर्ट च्या रूपातही करण्यात आला होता. इंटरनेट स्पेकुलेटिव फ़िक्शन डेटाबेस च्या नुसार कवर डिझाइन साठी राउल क्रूज ला क्रेडिट दिलं होतं.







एकूणच, कॉम्प्यूटर समोर बसलेल्या एका व्यक्तीचा प्राचीन काळातील फोटो व्हायरल करतांना ही मूर्ती १४०० वर्षांपूर्वी भारतातील पल्लव नावाच्या राजाच्या वेळी बनवण्यात आली होती असा खोटा दावा करत व्हायरल कऱण्यात आला होता. प्रत्यक्षात, ही कलाकृती कलाकार राउल क्रूज द्वारा बनवण्यात आला होता. त्यांनी २०१८ मध्ये हा व्हायरल होणारा फोटो अपलोडही केला होता.

Updated : 25 Feb 2023 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top