Fact Check : ओरियो बिस्किट डुक्कराच्या दुधापासून तयार होते ?
X
सोशल मीडियावर एक इन्फोग्राफिक शेअर केले जात आहे. यामध्ये इंग्रजी आणि उर्दू भाषेत काही ओळींसोबत 'ओरियो' बिस्किटाचे फोटो आहेत (oreo biscuit). लिखित स्वरूपात 'ओरियो' बिस्किट 'हराम' आहे. कारण ते वसा आणि डुक्कराच्या दुधापासून तयार होते. यासंदर्भात कंपनीने अधिकृतरित्या सांगितले आहे की, या व्हायरल इन्फोग्राफिक्समध्ये 'जमजम रियल्टर्स' नावाच्या एका कंपनीबाबत माहिती देण्यात आली आहे. हीच कंपनी या व्हायरल माहितीची सोर्स आहे.
इंग्रजीतल्या मजकूरात लिहिण्यात आलंय की, " देवासाठी कृपया हे शेयर करा. आपले डोळे उघडा. कंपनीने अधिकृतरित्या घोषणा केली आहे की, ओरियो बिस्किट मुस्लिमांसाठी प्रतिबधित आहे. कारण ते डुक्कराच्या दुधापासून तयार केलेले आहे. ही माहिती शेयर करा, कारण तुमच्या मित्रांमध्येही याविषयी जागृती व्हावी".
ऑल्ट न्यूज च्या या बातमीची वस्तुस्थिती तपासण्यासाठी व्हाट्सएप हेल्पलाईन नंबर (+91 7600011160) वर कित्येकांनी विनंती केलेली आहे.
काही ग्राफिक्समध्ये बदल करून हाच दावा फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेयर केला जात आहे.
Fact Check :
ऑल्ट न्यूज ने (Alt News) वायरल ग्राफिक वर नमूद केलेल्या कंपनीच्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला सुरूवात केली. कुणीही कॉलला प्रतिसाद दिला नाही. मात्र, कंपनीकडून आम्हांला मेसेजद्वारे तात्काळ प्रतिसाद मिळाला. त्या मेसेजमध्ये कंपनीने स्पष्ट केले की, या वायरल पोस्ट संदर्भात त्यांना काहीच माहिती नाही. कुणीतरी सोशल मीडियावर माहिती पसरवण्यासाठी कंपनीचा संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि लोगो चा वापर केला.
यानंतर ऑल्ट न्यूज ने ओरियो युके च्या वेबसाईटला भेट दिली आणि त्यांच्या FAQ पेजची तपासणी केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, " युरोपमध्ये तयार होणारे ओरियो बिस्किट हलाल प्रमाणित नाही. मात्र, या बिस्किटाची उत्पादन प्रक्रिया ही मुस्लिमांसाठी गैर नाही". यात पाच ओरियो उत्पादनांची यादी पण देण्यात आली आहे. यात इस्लाम धर्मातील आहार प्रतिबंधांचं पालन करण्यात आलेलं नाही. ओरियो स्ट्रॉबेरी चीजकेक, ओरियो चोको ब्राउनी, ओरियो एनरोब्ड मिल्क एन्ड व्हाइट, ओरियो कॅडबरी कोटेड आणि ओरियो क्रंची बाइट्स या बिस्किटांचा समावेश यादीत आहे.
2019 मध्ये ओरियो च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले होते. त्यात ओरियो बिस्किट उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये हलाल प्रमाणित नसल्याचं सांगण्यात आलं होतं.
याचा अर्थ काय आहे ?
याआधी, भारतीय उत्पादनांना हलाल सर्टिफिकेशन (Halal Certification) देणा-या जमीयत उलमा हलाल फाऊंडेशन (JUHF) मध्ये समन्वयक आणि शरिया ऑडिटर, वसीम अख्तर शेख ने ऑल्ट न्यूज शी बातचीत करतांना सांगितलं की, " हलाल हा एक अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ 'अधिकृत'. यातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. जायज म्हणजे केवळ खानपानासाठी अधिकृत असं असून काहीतरी वस्तू परिधान किंवा पिण्यासाठी असाही अर्थ निघतो. यापलिकडे जाऊन अशा गोष्टी ज्या तुम्हांला बोलण्याची परवानगी देतात. हलाल च्या उलट शब्द आहे 'हराम' ज्याचा अर्थ आहे बेकायदेशीर किंवा नाजायज".
बीबीसीने हलाल भोजनाला इस्लामिक आहार म्हणून परिभाषित केले. त्यामुळे काही भागात ओरियो बिस्किट हलाल-प्रमाणित नसूनही कंपनी मात्र उत्पादन प्रक्रिया अधिकृत असल्याचं सांगते. याला वरील पाच उत्पादने अपवाद आहेत.
ऑल्ट न्यूज ने याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उद्योग जगतातील एका तज्ज्ञाशी संपर्क साधला. बिस्किटासारख्या बेकरी आयटमला 240-300 डिग्री सेल्सियस तापमानावर तापवलं जातं. त्यामुळे बिस्किट बनवण्याच्या प्रक्रियेत अल्कोहोल असण्याची सूतराम शक्यताच नाही. याशिवाय बिस्किट जसे की ओरियो मध्ये डुक्कराच्या मांसाचं दुध किंवा डुक्कराची चरबी असेल तर त्या पाकिटावर हिरवा सिम्बॉल दिसणार नाही. म्हणजेच संबंधित खाद्यपदार्थ हा शाकाहारी आहे. बिस्किटामध्ये पायसीकारी घटक असतो जो झाडं किंवा प्राण्यांमधून काढला जातो. मात्र, जर ओऱियो मध्ये जनावरांमधील पायसीकारी घटक असेल तर त्या पाकिटावर हिरव्या रंगाचा सिम्बॉल नसेल.
ऑल्ट न्यूज च्या एका प्रश्नाच्या उत्तरात, ओरियो ब्रँड चे मालक मोंडेलेज च्या प्रवक्त्याने सांगितलं की, " भारतात मोंडेलेज इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा निर्माण केलेले सर्व पदार्थ हे शाकाहारी आहेत. त्याच्या पाकिटावरील हिरवा रंगाच्या सिम्बॉलमधूनही ही गोष्ट सिद्ध होते.
(सौजन्य - ऑल्ट न्यूज : https://www.altnews.in/hindi/fact-check-does-oreo-biscuit-contain-fat-pork-milk-as-claimed-in-viral-post/)