Fact Check: दिलीप कुमार यांनी आपली संपत्ती मुस्लिम वक्फ बोर्डाला दान केली?
X
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक दावा केला जात आहे. दिलीप कुमार यांनी त्यांनी त्यांची सर्व संपत्ती "वक्फ बोर्ड" च्या नावावर केल्याचं अनेक ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ट्विटरवर अनेक लोकांनी असा दावा करत ट्विट केलं आहे. यामध्ये @RealArnab_ , @arunbajpairajan , @janardanspeaks , @janardanmis या ट्विटर हँडलचा समावेश आहे.
तर काही लोकांनी असा दावा केला आहे की, दिलीपकुमार यांनी वक्फ बोर्डाला ९८ कोटी रुपये दिले आहेत.
अनेकांनी वेगवेगळे दावे करत फेसबूक,
काय आहे सत्य - अल्ट न्यूजने दिलीप कुमार यांचे प्रवक्ता तसेच
Mouthshut.com चे संस्थापक आणि सीईओ फैजल फारुकी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, हा व्हायरल होणारा दावा खोटा असून दिलीप कुमार यांनी कोणतेही दान केलेलं नाही. असं सांगितलं आहे. फैजल फारुकी हे दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे फार जवळचे व्यक्ती तसेच मित्र आहेत. आणि ते दिलीप कुमार यांचे सोशल मीडिया हँडलही चालवतात.
अल्ट न्यूजने महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनीस शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अशा देणग्यांबद्दल कार्यालयात कोणतीही माहिती नाही. तसंच आम्हाला अजूनपर्यंत असं काहीही कळालेलं नाही की, दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्डाला ९८ कोटी रुपये दिले आहेत. दिलीपकुमार यांच्या निधनानंतर लगेचच अनेकांनी त्यांच्या मुस्लिम ओळखीविषयी बोलताना द्वेषपूर्ण वक्तव्ये केली होती. त्यांनी मुस्लिम संघटनेला पैसे दान केल्याचा दावा देखील त्यांच्या विरोधात पसरविल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचाच एक भाग आहे.
वक्फ बोर्ड ही कायदेशीर संस्था आहे. प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड असतं. ज्यामध्ये एक सभापती, राज्य सरकारने निवडलेले १ किंवा २ सदस्य, मुस्लिम आमदार आणि खासदार यांचा समावेश असतो. वक्फ बोर्डाला देणगी देणे यात काहीही अवैध किंवा चुकीचे नाही. एखाद्या प्रसिद्ध मुस्लिम समाजातील व्यक्तीच्या विरोधात असा दावा शेअर केला जाणं हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. शाहरुख खानबद्दल सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा दावा शेअर केला जात आहे की, शाहरुख खानने पाकिस्तानच्या तेल टँकर स्फोटग्रस्तांना ४५ कोटी रुपये दिले. निष्कर्ष: एकूणच दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्डाला सुमारे ९८ कोटींची संपत्ती दान केल्याचा दावा खोटा आहे.