Fact Check: केरळच्या चर्चमध्ये ७ हजार कोटी मिळाले का?
X
सोशल मीडियावर अनेकदा लोक त्यांना चांगला वाटणारा मेसेज किंवा त्यांना सत्य वाटणारी एखादी माहिती भावनेच्या भरात पुढे फॉरवर्ड करत असतात. सध्या केरळच्या एका चर्चमधून ७ हजार कोटी रुपये जप्त केल्यासंदर्भात मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबत एक फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. ज्यात एका टेबलवर पैश्यांचे असंख्य बंडल ठेवलेले आहेत. आणि सोबतच चर्चमधील एका फादर्सचा फोटो सुद्धा जोडलेला आहे. ट्विटरवर अनेकांनी हा फोटो शेयर केला आहे.
@sp_subhash या ट्विटर हँडेलने हा फोटो शेअर करत म्हटलंय -
बेलोरियन ईस्टर्न चर्च, केरळमधील चर्चमधून ७ हजार कोटीचा काळा पैसा जप्त, बिशप जोहानन वागयारा संचालित, अंमलबजावणी संचालन विभागाने पकडले, कोणत्याही माध्यमाने दाखवलं का? विचार करा, या पैश्यातील दहाव्या हिस्स्यातील पैशाचा आरोप जर एका हिंदू संतावर झाला असता तर मीडियाने काय केलं असतं?.
पिंकी सिंह नावाच्या ट्विटर युजरनेही ही पोस्ट शेयर केली आहे.
फेसबुकवरही अनेकांनी हा फोटो शेयर केला आहे. आणि मीडियावर सवाल उपस्थित केला आहे.
काय आहे सत्य... ?
की-वर्ड्स सर्च केल्यानंतर या संदर्भातील काही रिपोर्ट मिळाले. मिळालेल्या रिपोर्टनुसार 5 नोव्हेंबर 2020 रोजी केरळमधील तिरुवाला येथील बेलिव्हर्स चर्चमध्ये छापा टाकण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 2020 च्या 'दि हिंदूंच्या' रिपोर्टनुसार अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देणगीच्या स्वरूपात परदेशातून येणार पैसा हा खाजगी कामासाठी तसेच अधिकृत नसलेल्या व्यवहारासाठी वापरला जात असल्याने हे छापे टाकले होते.
रिपोर्टमध्ये सांगितल्या नुसार
बेलिवर्स ईस्टर्न चर्चमधून एकूण 6 कोटी रुपये जप्त केले. ज्यामध्ये दिल्लीतील उपासनास्थळावरून सापडलेल्या 3.85 कोटी रुपयांचा समावेश सुद्धा आहे.
7 नोव्हेंबर 2020 च्या 'द इंडियन एक्स्प्रेसच्या' रिपोर्टनुसार, चर्चने रिअल इस्टेटच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च केले. देणगीतील पैसे हे चर्चच्या कामासाठी वापरणे हा एक धार्मिक उद्देश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चच्या गेल्या दहा वर्षांच्या व्यवहारांचे लेखापरिक्षण केलं जात आहे.
आयटी सोर्सच्या सुत्रानुसार गृह मंत्रालयाने बेलिव्हर्स ईस्टर्न चर्चचे एफसीआरए ( FCRA ) खाते बंद केल्याचे म्हटलं आहे. मातृभूमीच्या एका आर्टिकलमध्ये या संबंधित काही फोटोही शेअर केले गेले आहेत. हे फोटो व्हायरल फोटोंशी, मिळते-जुळते आहेत. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार कर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, चर्चला गेल्या 5 वर्षात परदेशातून आलेल्या देणग्यांमधून 6 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
याशिवाय 6 नोव्हेंबर 2020 च्या पीआयबीच्या ( IPB ) प्रेस रॅलीजमध्ये सुद्धा चर्चमधून 6 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकूणच फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही मेट्रोपॉलिटन बिशप के.पी. योहाननच आहेत. मात्र, गेल्यावर्षी केरळमध्ये झालेल्या छाप्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर ७ हजार करोड जप्त केल्याचा खोटा दावा करत शेअर केले जात आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा असल्याचं आमच्या टीमच्या निर्दशनात समोर आलं आहे.
या संदर्भातलं वृत्त Alt News या वृत्तसंस्थेनं दिल आहे. https://www.altnews.in/hindi/fact-check-did-7000-cr-rs-seized-from-it-raids-in-a-church-from-kerala/