Fact Check : पाठींबा देणाऱ्या देशांचे राहुल गांधी यांनी ट्विटरवर आभार मानले का?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली. त्यापाठोपाठ जर्मनीनेही आपली भूमिका मांडली. त्यानंतर पाठींबा देणाऱ्या देशांचे राहुल गांधी यांनी आभार मानल्याचा दावा एका प्रमुख माध्यमाकडून केला जात आहे. मात्र हा दावा खरा आहे का? जाणून घ्या भरत मोहळकर यांचे फॅक्ट चेक...
X
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांना 12 तुघलक रोड नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थान सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली. तर जर्मनीनेही आपली भूमिका मांडली. यानंतर राहुल गांधी यांनी या पाठींबा देणाऱ्या देशांना 'शुक्रिया' असं म्हणत आभार मानल्याचा दावा ABP News ने केला आहे. त्यावर सुप्रिया काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रिनाते यांनी यांनी ही बातमी अत्यंत चुकीची आहे. राहुल गांधी यांनी कधी आणि कुठे माफी मागितली. एबीपी न्यूजने यावर एक्शन घेण्याचा शब्द दिला आहे. मात्र माफी आणि स्पष्टीकरण दोन्हीही असू हवं आहे, असं सुप्रिया श्रिनाते यांनी म्हटलं आहे.
पियुष प्रधान या काँग्रेसशी संबंधित असलेल्या ट्विटर अकाऊंटवरून एबीपी न्यूज माफी मांगो, असं म्हटलं आहे.
आशिष यादव यांनीही हा गोदी मीडियाचा प्रोपगंडा पहा असल्याचे म्हणत दोन व्हिडीओ ट्वीट केले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही राहुल गांधी यांनी कधी माफी मागितली असं एबीपी न्यूजला विचारले आहे.
पडताळणी (Fact Check)
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर अमेरिका आणि जर्मनीने यावर प्रतिक्रीया दिली. त्यामध्ये आम्ही या घटनेवर लक्ष ठेऊन आहोत, असंही जर्मनीने म्हटलं आहे.
यानंतर राहुल गांधी यांनी ज्या देशांनी पाठींबा दिला आहे त्यांचे आभार मानले आहेत का? ते शोधण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला.
यामध्ये मॅक्स महाराष्ट्रने राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. यामध्ये राहुल गांधी कुठल्याही देशाचे आभार मानल्याचे वा त्यांना शुक्रिया म्हटल्याचे दिसून आले नाही.
राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर शुक्रिया दिसून न आल्यामुळे मॅक्स महाराष्ट्रने युट्यूबवर काही की-वर्ड सर्च केले. त्यामध्ये राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष सध्या लोकशाहीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. त्याबद्दल, मैं सभी विपक्ष दल को शुक्रिया कहेना चाहता हूँ, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मात्र राहुल गांधी यांना जर्मनीने पाठींबा दिल्याच्या बातमीवर काँग्रेसमधून इतर कुणी शुक्रिया म्हणालं आहे का? याचा शोध घेतला. त्यामध्ये दिग्विजय सिंह हे शुक्रिया म्हणाल्याचे दिसून आले.
काय आहे सत्य? (What is Reality)
त्यामुळे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जर्मनीचे आभार मानले. मात्र राहुल गांधी यांनी जर्मनी आणि अमेरिकेचे कुठल्याही प्रकारे आभार मानले नाहीत. त्यामुळे एबीपी माझाने दिलेले वृत्त खोटे असल्याचे सिध्द झाले आहे.